Winter Recipe: हिवाळ्यात आरोग्यासाठी पौष्टिक असणारी दुधी भोपळ्याची खिर कशी तयार करायची?

तुम्ही दुधी भोपळापासून खीर बनवू शकता. हि खीर थंडगार सर्व्ह केली जाते.
calabash
calabash Esakal

दुधी भोपळा ही अनेकांची ना आवडती फळभाजी आहे. अनेक मुलांना तर ही भाजी अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही नेहमीची भाजी किंवा करी बनवण्यापेक्षा दुधी भोपळाचा गोड पदार्थही बनवू शकता. तुम्ही दुधी भोपळापासून खीर बनवू शकता. हि खीर थंडगार सर्व्ह केली जाते.आजच्या लेखात आपण हिवाळ्यात आरोग्यासाठी पौष्टिक असणारी दुधी भोपळ्याची खिर कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी पाहू या...

साहित्य:

एक लहान दुधी भोपळा

अर्धा वाटी साखर

अर्धा लिटर दूध

अर्धा चमचा वेलची पूड

बदाम पिस्त्याचे काप

एक चमचा तूप

दोन चमचे बदाम काजू पावडर

calabash
Winter Recipe: हिवाळ्यात ओव्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे?

कृती:

सर्वप्रथम दुधी भोपळ्याची साल काढून धुवून किसून घ्यावी. नंतर गॅसवर कढई तापत ठेवावी त्यामध्ये चमचा तूप घालावे आणि किसलेला दुधी भोपळा तुपावर छान भाजून घ्या. भोपळा छान गुलाबीसर भाजल्यानंतर यामध्ये अर्धा लिटर दूध घालावे दुधाला उकळी आल्यानंतर साखर घालावी. पाच मिनिटं शिजू द्यावे. मध्ये मध्ये चमच्याने ढवळत रहा बदाम काजूची पावडर दोन चमचे घालावी. पिस्त्याचे काप घालावे आवडत असल्यावर केशरच्या काड्या घालापाच ते सात मिनिटं दूध छान आटू द्यावे यामध्ये दुधी भोपळा पण छान शिजतो दाटसर झाल्यानंतर वरून वेलची पूड घालावी आणि गॅस बंद करा थंड करत ठेवा फ्रिजमध्ये थंड करून खाल्ल्यावर ती सुद्धा खूप छान लागतोदुधी भोपळा खूप पौष्टिक असतो आठवड्यातून किमान एकदा तरी आहारात घ्यावा असा वेगवेगळ्या पद्धतीने केल्यानंतर घरच्यांना नक्कीच आवडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com