Shravan 2022 : श्री निळकंठेश्वराच्या दर्शनासाठी रांगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur Killari Nilakanteshwar mahadev temple

Shravan 2022 : श्री निळकंठेश्वराच्या दर्शनासाठी रांगा

किल्लारी : येथील स्व:यंभु लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र श्री निळकंठेश्वराचे श्रावण महिण्याच्या पहिल्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

दोन वर्षे हे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे श्रावण महिन्यामध्ये नागरिकांना मनाई करण्यात आली होती. मात्र  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी यात्रा होणार आहे. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

किल्लारी व परिसरातील शेकडो महिला पुरुषांनी पहाटेपासून चार ते सहा किलोमीटरचे अंतर पायी चालून दर्शन घेतले. दर सोमवारी येथे अभिषेक केले जातात. मात्र श्रावण महिन्यातील सोमवारी अभिषेकासाठी मोठी गर्दी असते.

यावेळी किल्लारीसह परिसरातील मंगरूळ, गुबाळ, नांदुर्गा, तळणी, बाणेगाव, चिंचोली, कवठा, नदी हत्तरगा, कारला, कुमठा सिरसल, लामजना आदी गावचे भाविक भक्त अभिषेक व पूजेसाठी आले होते. राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी येथील आकरा दिवसीय यात्रेला सुरुवात होत असते. याकामी देवस्थान कमिटी तसेच भाविक भक्त मोठ्या उत्साहाने तयारीला लागले आहेत. )

Web Title: Shravan 2022 Latur Killari Nilakanteshwar Mahadev Temple

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..