
Shravan 2022: शितळा सप्तमी व्रत कसे केले जाते ?
श्रावण हा संपूर्ण महिना व्रतांनी आणि सण उत्सवांनी परिपूर्ण आहे. या महिन्यातील प्रत्येक दिवस आपल्या परंपरा आणि संस्कृतीला जपण्याचा आहे. पहिला श्रावण सोमवार, पहिली मंगळागौर, नागपंचमी यानंतर श्रावण षष्ठी आणि श्रावण महिन्यातील शुद्ध सप्तमी येते. श्रावण महिन्यातील शुद्ध सप्तमीला शितळा सप्तमी किंवा शिळासप्तमी असे म्हणतात,हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात.
शितळा सप्तमीच्या अनेक कथा आहेत परंतु एका कथेनुसार, शितळा सप्तमी भाजली गेली होती तेव्हापासून तीला सर्व शीतल म्हणजेच थंड करून दिलं जातं, अर्थात चूल पेटवत नाही कारण या दिवशी शितळा माता चुलीजवळ वावरत असते, अशी समजूत आहे.
हेही वाचा: Shravan 2022: रविवारी आदित्य राणूबाई व्रत कसे करावे ?
शितळा सप्तमीच्या दिवशी काय करतात ?
घरातील चूल, शेगडी, आधुनिक युगात गॅस स्टोव्ह व इतर स्वयंपाक शिजत असलेल्या साधनांची स्वच्छता करून त्यांची पूजा करतात. या दिवशी शितळा देवीची पूजा करतात. षष्टीच्या दिवशी खाद्य पदार्थ तयार करून ठेवले जातात आणि सप्तमीला या पदार्थांचे नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण केला जातो. या दिवशी जलाशयांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. या पूजेने मुलांना आजार होत नाही आणि त्यांच्यावरील संकट दूर होतात, अशी धारणा आहे.
Web Title: Shravan 2022 Shitala Saptami Vrat Rituals
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..