Shravan 2022: रविवारी आदित्य राणूबाई व्रत कसे करावे ?

आजही खानदेशात हे व्रत विशेष प्रचलित आहे.
Aditya Ranubai Vrat
Aditya Ranubai Vrat Esakal

आषाढी एकादशीपासून चातुर्मासाचा सात्विक काळ सुरू होतो. चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिना हा उपवासांचा, व्रतांचा, उत्सवाचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक वाराचे वेगळे महत्त्व आहे. वारानुसार, त्या त्या देवतांचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध-बृहस्पति पूजन, जिवतीची पूजा किंवा जरा जिवंतिका पूजन, अश्वत्थ मारुती पूजन याप्रमाणे श्रावणातील रविवारी सूर्याचे पूजन केले जाते. यावेळी आचरल्या जाणाऱ्या व्रताला आदित्य राणूबाई व्रत म्हणतात . आज आपण याच आदित्य राणूबाई व्रताविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Aditya Ranubai Vrat
Shravan 2022: श्रावणातील पहिला शनिवार अश्र्वत्थ मारूती पूजेच्या मागची काय आहे कहाणी ?

कशी करतात आदित्य राणूबाई व्रताची पूजा ?

श्रावणाच्या केवळ पहिल्या रविवारी हे व्रत करण्याची प्रथा आहे. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. रविवारच्या दिवशी सकाळी उठून अंघोळ करून,देवघराजवळ विड्याच्या पानावर सूर्याचे चित्र रक्तचंदनाने काढावे. बाजूला एका वर्तुळात षट्‌कोण काढावा. नंतर सहापदरी दोऱ्याला सहा गाठी मारून मग (सूर्यचित्र, षइकोन आणि सहा गाठी मारलेला सहापदरी दोरा) ह्या सर्वांची एकत्रित पूजा करावी. ही पूजा झाल्यानंतर दुपारी एका सुवासिनीला जेवायला बोलवावे.असं सांगितलं जातं की, राणूबाई ही सूर्याची पत्नी आहे.आणि सूर्याच्या पत्नीची पूजा ह्या व्रतात केली जाते. आजही खानदेशात हे व्रत विशेष प्रचलित आहे. खानदेशातील बऱ्याच घरांमध्ये कुठल्याही मंगलकार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्याचे लग्न लावण्याची पध्दत आहे. फार पुर्वीपासुन कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत प्रचलित आहे. श्रावण मास हा उपवासांचा, व्रत-वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. साहजिकच पहिला श्रावणी रविवार हा आदित्य-राणूबाईंच्या पूजेसाठी राखला गेला असावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी विधिवत हे व्रत करावे. शक्य नसेल त्यांनी स्नानादी नित्यकर्म करून सूर्य आणि राणूबाईंची मानसपूजा करून गायत्री मंत्राचा जप करावा.

Aditya Ranubai Vrat
Shravan 2022: भगवान महादेवाला प्रिय असलेल्या धोतरा वनस्पतीचे औषधी उपयोग...

काय आहे श्रावणी रविवार कहाणी ?

राणूबाई ही सूर्याची पत्नी. तिची पूजा या व्रतात केली जाते. तिची कथा न ऐकल्याने एका राणीला दारिद्र्यावस्था प्राप्त झाली. तिला या गोष्टीचा खूप पश्चात्ताप झाला. यानंतर तिने आदित्य राणूबाईची पूजा केली. व्रताचा संकल्प करून आदित्य राणूबाईचे मनोभावे पूजन केले. या व्रतानंतर तिला पुन्हा गतवैभव लाभले. अशा आशयाच्या कथा पुराणात आढळून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com