
Shravan somvar: यंदा कधी आणि किती श्रावण सोमवार जाणून घ्या..
हेही वाचा: Nag Panchami 2022 : श्रावण महिन्यात कधी आहे नागपंचमी?
आषाढ महिन्याच्या पौर्णिमेपासून म्हणजे गुरूपौर्णिमेपासून राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि बिहार येथे श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे पण, महाराष्ट्रात शुक्रवार २९ जुलै २०२२ पासून श्रावण मासारंभ होत आहे. हिंदू पंचागांतील श्रावण हा पाचवा महिना आहे. हा निसर्गरम्य वातावरणासाठी देखील ओळखला जातो. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहेत. मात्र, यातील सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार.या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. विशेषत: श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तत्काळ फळ मिळते असे म्हणतात.
हेही वाचा: व्यसनासाठी काहीपण! महादेव मंदिरातून घंट्यासह कलशाची चोरी
यावेळी ४ श्रावण सोमवार पुढीलप्रमाणे यंदा २९ जुलै रोजी श्रावण मासारंभ होत आहे. पहिला श्रावणी सोमवार ०१ ऑगस्ट २०२२ रोजी आहे. यानंतर ०८ ऑगस्ट २०२२ रोजी दुसरा श्रावणी सोमवार, १५ ऑगस्ट २०२२ रोजी तिसरा श्रावणी सोमवार, २२ ऑगस्ट २०२२ रोजी चौथा श्रावणी सोमवार आहे. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही वेगळे आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा सोमवार असल्यास शिवामूठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे. यंदा मात्र एकूण ४ श्रावण सोमवार आहेत. शनिवार २७ ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्या असून श्रावण महिना समाप्त होईल.
श्रावणात काय केले पाहिजे...
शास्त्रानुसार, श्रावण महिन्यात शंकराची पूजा,महामृत्युंजय मंत्र, शिव पुराणाचे पाठ, रुद्राभिषेक केल्याने कर्ज, आरोग्य, दोष आणि इतर अडचणींपासून मुक्ती मिळते. श्रावणातील मंगळवार म्हणजे मंगळागौरीचे त्यामुळे मंगळवारचे देखील वेगळे महत्व आहे. श्रावणाच्या पहिल्या सोमवारनंतर म्हणजे मंगळवारी २ ऑगस्टला नागपंचमी आहे. शंकराचे आणि नागाचे विशेष नाते आहे आणि यासंबंधी कथा देखील सांगण्यात येतात. नागपंचमीच्या दिवशी शंकराला कच्चे दूध,गंगाजल,बेलपत्र, काळे तीळ, धोत्रा, मिठाई इत्यादी अर्पण करून विधीवत पूजा केली पाहिजे.
Web Title: Shravan Somvar Dates For 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..