व्यसनासाठी काहीपण! महादेव मंदिरातून घंट्यासह कलशाची चोरी

व्यसन भागवण्यासाठी किंवा मौज मस्ती करण्यासाठी खिशात पैसे नसले तर चोरटे कुठल्या थराला जातील, याचा नेम नाही.
Theft
Theftesakal
Updated on

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : व्यसन भागवण्यासाठी किंवा मौज मस्ती करण्यासाठी खिशात पैसे नसले तर चोरटे कुठल्या थराला जातील, याचा नेम नाही. भऊर (ता. चाळीसगाव) शिवारातील गिरणा काठावरील महादेवाच्या मंदिरातील सुमारे १५ किलो वजनाची घंटा व तांब्याचा कलश चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.

भऊर येथे गिरणा काठावर जुने शिवमंदिर आहे. या ठिकाणी भाविक नियमित दर्शनासाठी येत असतात. मंदिरावर भाविकांची श्रद्धा असल्याने लोकवर्गणीतून मंदिरात सुमारे १५ ते २० किलो वजनाचा घंटा बसवण्यात आला होता. शिवाय मंदिरातील शिवलिंगावर जलाभिषेक होण्यासाठी तांब्याची घागरली लावलेली होती. आज सकाळी भऊर येथील शामा मासरे हे नेहमीप्रमाणे दर्शनासाठी मंदिरात आले असता, त्यांना मंदिरात घंटा व तांब्याची घागर दिसून आली नाही. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता, कोणालाही काहीही माहीत नव्हते. व्यसन भागवण्यासाठी भुरट्या चोरट्यांनी ही चोरी केली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, या चोरीची माहिती मेहुणबारे पोलीसांना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. चोरट्याने मंदिरातील घंटा चोरून नेल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Theft
कोरोनात काम केलेले वाहन चालक- मालक बिलांसाठी झिजविताहेत पोलिसांचे उंबरठे
Theft
सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या युवकास अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com