Diwali Festival 2021 : धनत्रयोदशीचा मुहूर्त कधी? जाणून घ्या धन्वंतरी जयंतीचं महत्व

On the day of Dhantrayodashi, buy Ganesh idol, silver, brass earthenware, Kersuni
On the day of Dhantrayodashi, buy Ganesh idol, silver, brass earthenware, Kersuni

दीपावली हा दिव्यांचा उत्सव ! हा प्रकाशाचा उत्सव असतो. आनंदाचा उत्सव असतो. अज्ञान, आळस, अंधश्रद्धा , अनीती-  भ्रष्टाचार या काळोखाला घालवून आपण ज्ञान, उद्योगीपणा,वैज्ञानिक दृष्टिकोन, नैतिकता यांचा प्रकाश आणूया ! तसेच मनातील आणि शभोवतालचे प्रदूषण दूर करण्याचा प्रयत्न करूया.

 मंगळवार, २ नोव्हेंबला, धनत्रयोदशी- धन्वंतरी जयंती  आहे. म्हणूनच दीप्यते दीपयति वा स्वं परं चेति इति दीप: ' ' स्वत: प्रकाशतो किंवा दुसर्याला प्रकाशित करतो तो दीप होय '. दीप हे अग्नीचे किंवा तेजाचेच एक रूप आहे. दीपावली या सणाची उपपत्ती पुढीलप्रकारे सांगितली जाते.

१) हा सण शरद ऋतूमध्ये येतो. शेतातून नवीन धान्य घरामध्ये येते, म्हणून हा आनंदोत्सव साजरा केला जातो.

२) आर्यांचे पूर्वज उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते. सहा महिन्यांची रात्र संपून सहा महिन्यांच्या दिवसाला प्रारंभ होतो म्हणून दीपावलीचा आनंदोत्सव साजरा केला जातो.

३) प्रभु रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवून सीतेसह अयोध्येत परत आले म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.

४) बळीराजाने वामनापाशी वर मागितला, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेला दीपोत्सव साजरा केला जातो.

५) सम्राट अशोकाने दिग्विजयाप्रीत्यर्थ दीपोत्सव सुरू केला.तीच परंपरा पुढे चालू राहिली. अर्थात भारतासारख्या शेतीप्रधान देशात या दिवसात धान्य घरात येते हेच कारण योग्य वाटते.

शुभ मुहूर्त - मंगळवार, २ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९-३१ ते १०-५६ चल, सकाळी १०-५७ ते दुपारी १२-२१ लाभ, दुपारी १२-२२ ते दुपारी १-४६ अमृत, दुपारी ३-११ ते सायं.स४-३६ शुभ चौघडी वेळेत हिशेबाच्या नवीन वह्या आणाव्यात.

दीप दानाचे महत्व

धनत्रयोदशीला यमराजाला प्रसन्न करून घेण्यासाठी ' दीपदान ' करण्याची प्रथा आहे. उपवास करून विष्णू, लक्ष्मी,कुबेर,योगिनी, गणेश, नाग, आणि द्रव्यनिधी या देवतांचे पूजन करतात. अखंड दीप लावला जातो. दुधाचा नैवेद्य अर्पण केला जातो. काही लोकांमध्ये धने-गूळ यांचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे गरजू लोकांना दीपदान करावयाचे असते. गरीबानाही दीपावलीचे पुढचे दिवस घरात दीप लावून आनंदोत्सव साजरा करता यावा हा यामागचा हेतू आहे. तसेच केवळ दीपच नव्हे, तर त्याबरोबर गरजूंना नवीन कपडे व मिठाईचेही दान करावे.
यमदीपदानासंबंधी एक कथा सांगितली जाते. एकदा यमराजाने यमदूताना विचारले - " तुम्ही जेंव्हा प्राणिमात्रांचे जीव हरण करता तेंव्हा तुम्हाला दया येत नाहीका ? कधी असा कठोर प्रसंग आला आहे का ? "
त्यावेळी यमदूत म्हणाले -" ज्यावेळी कमी वयाच्या माणसाचे प्राण हरण करावयाचे असतात त्यावेळी जो आकांत होतो तो खूप ह्रदयद्रावक असतो. म्हणून महाराज, अपमृत्यू टाळण्यासाठी तुम्ही काहीतरी उपाय सांगा. "
यांवर यमराज म्हणाले -" धनत्रयोदशीच्या दिवशी जो दीपदान, वस्त्रदान, अन्नदान करून परोपकार करील त्याच्या घरात कधीही अपमृत्यू होणार नाहीत."
महर्षी व्यास आणि संत तुकारामानी सांगितले आहे की गरीबाना मदत हेच पुण्यकर्म ! आणि गरीबाना त्रास देणे म्हणजे पाप कर्म ! गरीबांना समाजातील इतर लोकांनी मदत करावी म्हणून दीपावलीच्या प्रारंभी धनत्रयोदशीच्या दिवशी हे परोपकाराचे कार्य करण्यास सांगितलेले आहे.
तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी दागिन्यांची स्वच्छता करण्याची प्रथा आहे. दीपावलीच्या दिवसात हे दागिने घालावयाचे असतात म्हणून ही प्रथा पडली असावी. या दिवशी काही लोक धन आणि दागिने यांची पूजा करतात. तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी व्यापार लोक शुभ चौकडी मुहूर्त पाहून नवीन वर्षाचे हिशोब लिहीण्यासाठी वह्या खरेदी करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com