Spiritual Importance Of AUM : ओमकाराने साधते सर्वाधिक एकाग्रता, गितेत कृष्णाने सांगितले...

अष्टांगयोगाच्या मार्गदर्शनानंतर आता ओंकाराची साधना कशी करावी ते श्रीकृष्ण सांगतो.
Spiritual Importance Of AUM
Spiritual Importance Of AUMesakal

Spiritual Importance Of AUM : फलदायी ओंकार

शन्ति यद्यतयो वीतरागाः।

यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति

तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ॥

वेदवेत्ते ज्या अक्षराचा उच्चार करतात, यती वितराग होऊन ज्यात प्रवेश करतात आणि ज्याची इच्छा करून ते ब्रह्मचर्यव्रताचे पालन करतात ते पद म्हणजेच ओंकारब्रह्म; तुला संक्षपाने सांगतो‌.

गीतेमध्ये सर्वच भारतीय तत्त्वज्ञानाचे सार आहे, असे जे सांगतात. त्याचा प्रत्यय अभ्यास करताना सातत्याने येतो. अष्टांगयोगाच्या मार्गदर्शनानंतर आता ओंकाराची साधना कशी करावी ते श्रीकृष्ण सांगतो. परमात्म्याचा व्यक्त हुंकार म्हणजेच ओंकार.

ओंकाराचे महत्त्व सर्वच योगसाधक, संत, महंत, तपस्वी सांगत असतात. अकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा यांचा संयुक्त उच्चार म्हणजेच ओम्. या ओंकारातूनच विश्वाचे सर्जन झाले आहे. त्यालाच शब्दब्रह्म किंवा अक्षरब्रह्म असे म्हणतात. परमात्मा अव्यक्त आहे आणि ओम् हे त्याचे प्रतीक आहे. परमात्म्याशी जोडून देणारा सर्वश्रेष्ठ ध्वनी ओम् आहे.

त्यामुळेच सर्व साधनामार्गात (ज्ञानयोग, ध्यानयोग भक्तियोग इ.) ओंकाराचे फारच महत्त्व मानलेले आहे. श्रीकृष्ण सांगतो, ‘सर्व इंद्रियांचे संयमन करून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून ओम् असा या एकाक्षर ब्रह्माचा सतत उच्चार करत ईश्वराचे स्मरण केले असता ईश्वराची प्राप्ती होते.’

Spiritual Importance Of AUM
Spiritual Facts : कर्मकांड नव्हे तर स्वतःच्या शरीरात राहणाऱ्या आत्म्याला ओळखणे म्हणजे अध्यात्म

मुलांना होणारे फायदे

आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा ओंकाराच्या साधनेने, त्याच्या उच्चाराने ध्यान केले असता अनेक शारीरिक आणि मानसिक लाभ मिळतात. एकाग्रता वाढते. ऊर्जा मिळते. उत्साह वाढतो. आकलन शक्तीसुद्धा वाढते. मस्तकास स्थिरता आणि शांती प्राप्त होते, असे योगाभ्यासक अनुभवतात. अर्थात, याचा उच्चार कसा आणि किती करावा याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण तज्ज्ञ गुरूंकडून घेऊन मगच त्याचा प्रयोग केला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com