Spiritual Science : आरतीच्या वेळी टाळ्या वाजवण्याचं धार्मिकच नाही तर, हे आहे शास्त्रीय कारण l Spiritual Science Clapping Benefits In Arati bhajan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Spiritual Science

Spiritual Science : आरतीच्या वेळी टाळ्या वाजवण्याचं धार्मिकच नाही तर, हे आहे शास्त्रीय कारण

Clapping Benefits In Arati : तुम्ही हे कायम बघितलं असेल की कुठेही आरती, भजन, किर्तन सुरू असेल तेव्हा लोक टाळ्या वाजवतात. टाळ्या फक्त ताल धरण्यासाठी म्हणून वाजवल्या जात नाहीत. तर यामागे विशेष कारण आहे. ही परंपरा कधी सुरू झाली, शिवाय यामागे काही धार्मिक, वैज्ञानिक कारणं, फायदे आहेत का? विषयी सविस्तर जाणून घेऊया.

भक्त प्रल्हादाने केली होती सुरवात

एका पौराणिक कथेनुसार टाळी वाजवण्याची सुरुवात भक्त प्रल्हादाने केली होती. भक्त प्रल्हादाच्या वडिलांना विष्णू भक्ती आवडत नव्हती. यासाठी त्यांनी अनेक उपाय पण केले. पण प्रल्हादावर त्याचा काहीही परीणाम झाला नाही. एकदा त्यांनी प्रल्हादचे सगळे वाद्य नष्ट केले. हिरण्यकष्यपूला वाटले असं केल्याने प्रल्हाद थांबेल.

पण असं झालं नाही. प्रल्हादाने भगवंताचे स्मरण करताना टाळ्यांचा ताल धरला. या टाळीतून ताल निर्माण झाल्याने याला टाळी असं नाव पडलं. त्यानंतरच टाळ्या वाजवण्याची परंपरा सुरू झाली.

टाळी वाजवण्याचं धार्मिक महत्व

असं मानलं जातं की, टाळी वाजवून तुम्ही देवाला तुमची गाऱ्हाणी ऐकायला बोलवतात. असं केल्याने देवाचं लक्ष वेधलं जातं. शिवाय आरती, भजन, किर्तन यावेळी टाळी वाजवल्याने पाप नाश होतात असं मानलं जातं. आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते असे म्हणतात.

वैज्ञानिक महत्व

वैज्ञानिक कारण म्हणजे टाळी वाजवल्याने हाताच्या अॅक्युप्रेशर पॉइंट्स वर दाब पडतो. हृदय, फुफ्फूसासंबंधी रोगांमध्ये लाभ मिळतो. यामुळे ब्लड प्रेशर संतुलीत राहतं. याला एक प्रकारचा योग समजलं गेलं आहे. असं रोग केल्याने बऱ्याच रोगांपासून मुक्ती मिळते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

टॅग्स :Hindu religionhealth