Sri Family Guide : स्वतःला जाणून घ्या - भाग १

आजचा विषय आहे स्वजाणीव. हा शब्द अतिशय सूचक आहे आणि त्याचा नेहमी चुकीचा अर्थ लावला जातो.
Sri M
Sri Msakal

- श्री. एम, आध्यात्मिक गुरू

आजचा विषय आहे स्वजाणीव. हा शब्द अतिशय सूचक आहे आणि त्याचा नेहमी चुकीचा अर्थ लावला जातो. येथे मी उपनिषदांचा संदर्भ घेणार आहे; कारण ‘स्व’विषयीच्या ज्ञानाबाबत सर्वांत महत्त्वाच्या आणि अधिकारयुक्त उपदेशांमध्ये त्यांचा समावेश होतो.

अगदी प्रारंभीच्या काळापासून वेदांमधील लिखित नोंदीसहीत सर्व थोर गुरू स्वजाणिवेविषयी बोलले आहेत. मानवा, स्वत:ला ओळख!

स्वत:ला ओळखा, असे महान ग्रीक तत्त्वज्ञानी सॉक्रेटिस सांगून गेला. उपनिषदेही तेच सांगतात आणि सर्व उत्कृष्ट आध्यात्मिक उपदेशही. ज्याला स्वत:ला ओळखता आले, तोच देवाला जाणू शकतो. आपल्यालाही वेदांमधील शिकवण माहीत आहे, ज्यात ‘देव-जाणीव’ याऐवजी ‘स्व-जाणीव’ हा शब्द वापरला आहे.

‘स्व’ला ओळखणे म्हणजे ‘ते’ ओळखणे. ते म्हणजे तुम्ही त्याला जे काही नाव देता ते– मग तो ईश्‍वर असो, ब्रह्म असो की परमात्मा, किंवा अगदी शून्य असो. स्वत:ला ओळखणे ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. आध्यात्मिक गोष्टींच्या मीमांसेत, सत्य जाणण्यासाठी, प्रथम आपल्याला जो सत्याचा शोध घेत आहे तो माहीत असला पाहिजे आणि तो असतो आपला ‘स्व’. या स्व-मीमांसेत आपण ‘स्व’विषयी आढावा घेणे आवश्यक आहे.

आपल्या क्षमता, उणिवा, सामर्थ्ये, प्रतिभा आणि आपली वाईट बाजूदेखील. सामान्य ज्ञान सांगते की, असे स्व-मूल्यांकन केल्याशिवाय कोणताही उपक्रम समजून घेणे किंवा सुरू करणे शक्य नाही. म्हणून जेव्हा स्वतःला जाणून घ्यायचे असेल, तेव्हा आपण याक्षणी काय आहोत हे समजून घेऊन सुरुवात केली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com