esakal | Solapur : नवरात्रोत्सवानिमित्त रूपाभवानी मंदिरातर्फे 'असे' होणार धार्मिक कार्यक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रोत्सवानिमित्त रूपाभवानी मंदिरातर्फे 'असे' होणार धार्मिक कार्यक्रम

शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त येथील श्री रुपाभवानी देऊळ ट्रस्टतर्फे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत.

नवरात्रोत्सवात रूपाभवानी मंदिरात 'असे' होणार धार्मिक कार्यक्रम

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर : शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त (Navratri Festival) येथील श्री रुपाभवानी देऊळ (Rupabhavani Temple) ट्रस्टतर्फे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. आज गुरुवारी (ता. 7) दुपारी 11 ते 12.30 या वेळेत घटस्थापना होईल. त्यानंतर देवीची नित्योपचार पूजा करण्यात येईल आणि रात्री छबिना निघणार असून, असे सतत नित्यनियमाने धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

तसेच शुक्रवारी (ता. 8) देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना. त्यानंतर शनिवारी (ता. 9) देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना. त्यानंतर रविवारी (ता. 10) ललिता पंचमीदिनी श्री देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना काढण्यात येईल. सोमवारी (ता. 11) श्री देवीची नित्योपचार पूजा आणि छबिना, मंगळवारी (ता. 12) श्री देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना काढण्यात येईल.

हेही वाचा: अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले!

बुधवारी (ता. 13) दुर्गाष्टमीनिमित्त श्री देवीची अलंकार महापूजा होईल. दुपारी 3 वाजता होमास प्रारंभ होईल. रात्री 8 वाजता पूर्णाहुती होईल. सायंकाळी 7 वाजता मल्लिनाथ मसरे घरातून दहीहंडी घेऊन निघणार आहेत व रात्री छबिना निघणार आहे. तसेच गुरुवारी (ता.14) महानवमी निमित्त श्री देवीची अलंकार पूजा व रात्री छबिना होणार आहे. शुक्रवारी (ता. 15) विजयादशमी (दसरा) दिनी सकाळी 9 वाजता श्री देवीची अलंकार महापूजा व सायंकाळ चार वाजता सवाद्य देवीची पालखी प्रदक्षिणा, सीमोलंघन व शमीपुजन याप्रमाणे कार्यक्रम होतील.

तसेच मंगळवारी (ता. 19) कोजागरी पौर्णिमा उत्सवानंतर श्री देवीची अलंकार पूजा व रात्री छबिना निघेल. याप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव साजरा होणार आहे, अशी माहिती श्री रुपाभवानी देऊळ ट्रस्टतर्फे ट्रस्टी वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ रामप्पा मसरे यांनी दिली.

हेही वाचा: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर होणार भाविकांसाठी खुले; पाहा व्हिडिओ

दर्शन पास काढून शासनाच्या नियमानुसार नवरात्र काळात भाविकांनी रुपाभवानी देवी दर्शनासाठी यावे. यासाठी ऑनलाइन पास प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दर्शनास येण्यास इच्छुक भाविकांनी ऑनलाइन पास बुकिंग करून स्वतःचे दर्शन पास काढून घ्यावे. रुपाभवानी देवी दर्शन पास काढण्यासाठी भाविकांनी कोव्हिशिल्ड / कोवॅक्‍सिन या लसीचे दोन डोस घेतलेले असणे अनिवार्य आहे. दर्शनास येताना सोबत लसीकरणाचे प्रमाणपत्र आणि स्वतःचे ओळखपत्र आणणे आवश्‍यक आहे. भाविकांनी या

www.shrirupabhavanidevasthan.com या दिलेल्या लिंकवर क्‍लिक करून दर्शन संकेतस्थळावर दर्शन नोंदणी करता येणार आहे.

loading image
go to top