esakal | Solapur : अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले!
sakal

बोलून बातमी शोधा

Swami Samarth Temple

अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर आज गुरुवारपासून भक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले!

sakal_logo
By
चेतन जाधव

अक्कलकोट (सोलापूर) : घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, अक्कलकोट (Akkalkot) येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ (Swami Samarth) मंदिर आज गुरुवारपासून काकड आरतीने भक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. कोविड-19 ची (Covid-19) नियमावली व शासनाचे निर्देश पाळून भक्तांना दर्शनासाठी पहाटे पाचपासून रात्री नऊपर्यंत मंदिरात सोडण्यात येणार असल्याची माहिती वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे (Mahesh Ingale) यांनी दिली.

हेही वाचा: भाजपच्या माजी मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात विरोधी एकही नाही नगरसेवक

आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिर उघडणार असून, वटवृक्ष मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त घटस्थापना व श्री देवीच्या मूर्तींची स्थापना ही प्रतिवर्षी होत असते. या पार्श्वभूमीवर मंदिर उघडणे व नवरात्र प्रक्षाळपूजेच्या निमित्ताने बुधवारी स्वच्छता मोहीम येथील श्री वटवृक्ष मंदिरात मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, पुरोहित मंदार पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

याप्रसंगी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कोरोना संसर्गाच्या लाटेदरम्यान वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर बंद होते. या कालावधीत मंदिर परिसरातील विविध कामे चालू होती, परंतु आता मंदिर उघडणार आहे. तसेच गुरुवारी मंदिर उघडल्यानंतर शासनाने मार्गदर्शित केलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे वटवृक्ष मंदिरात स्वामी भक्तांची स्वामी दर्शनाची सोय केली जाईल. याप्रसंगी मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांना मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. तसेच ठराविक अंतराने भाविकांना टप्प्या- टप्प्याने दर्शनास सोडण्यात येईल. मंदिरातील कोणत्याही परिसरात भाविकांची सामूहिक गर्दी होऊ देणार नाही.

हेही वाचा: सोलापूर जिल्हा दूध संघाचे प्रशासक पापळ यांची नियुक्ती रद्द

मंदिरात विविध परिसरात भाविकांना सॅनिटायझरचा पुरवठा केला जाईल. तसेच कोरोनाविषयी जनजागृती म्हणून मंदिर समितीद्वारे वेळोवेळी नियमितपणे शासनाच्या कोरोनाबद्दलच्या गाईडलाईन्सचे अनाउन्समेंट करण्यात येईल. मंदिरात प्रवेश व बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने भाविकांची दर्शन घेण्याची सोय करण्यात येईल. येणाऱ्या भाविकांनीही मंदिर समितीच्या व शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून स्वामींचे दर्शन घेऊन देवस्थान समितीस सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले.

loading image
go to top