
Astrology Predictions : बुधवारी रात्री सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य आता कुंभ राशीत १४ मार्चपर्यंत राहणार आहे. आज (बुधवार) रात्री दहाच्या सुमारास हे परिवर्तन होणार आहे. सूर्य जेव्हा रास बदलतो तेव्हा त्याला संक्रांत म्हटले जाते. कुंभ संक्रांतीला नदी स्नान व दान-पुण्य केले जाते.
सध्या कुंभ राशीत शनी आणि बुध हे दोन्ही ग्रह आहेत. आता सूर्यही या राशीत प्रवेश करत आहे. यामुळे कुंभ राशीत सूर्य, शनी व बुध या तीन ग्रहांची युती होणार आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी बुध कुंभ राशीतून निघेल व मीन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर कुंभ राशीत सूर्य व शनी यांचा योग होणार आहे.