

हिंदू धर्मात पुजेच्या साहित्यात सुपारीचा वापर महत्वाचा असतो. सुपारीला श्री गणेशाचं रूप मानलं जातं. सुपारी गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे. विष्णु देवाची आणि लक्ष्मी मातेच्या पुजेत देखील सुपारीचा वापर केला जातो. सुपारीचा पुजेत वापर केल्याने सुख समृद्धी तसचं घरात बरकत येते.ज्योतीषशास्त्रानुसार तुम्ही याने अनेक प्रकारचे उपाय करू शकता. हे चमत्कारीक उपाय तुम्हाला अनेक समस्यांपासूव वाचवू शकतात. याने व्यवसायात आणि करिअर मध्ये यशस्वी व्हाल. घरात सुख,शांती समृद्धि नांदेल.चला तर मग आता जाणून घेऊया सुपारीने तुम्ही कोण कोणते उपाय करू शकता.
1) लग्नात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी...
लग्नाला उशीर होत असेल किंवा सुयोग्य जोडीदार मिळण्यात काही अडचणी येत असतील तर तुम्ही सुपारीचा वापर करू शकता. त्यासाठी सुपारीला अबीर लावून चंदनाच्या डब्यात ठेवा. पौर्णिमेच्या रात्री ती सुपारी मंदिरात ठेवावी. त्याने लग्नकार्यात येणारी विघ्न दूर होतील.
2) अडलेल्या कामांसाठी...
जर तुमची कामं बऱ्याच काळापासून अडली असतील तर तुम्ही सुपारीचा उपाय करू शकता. त्यासाठी पाकिटात दोन लवगांचे तुकडे आणि सुपारी ठेवावी. कामाच्या वेळी लवगं तोंडात ठेवा. सुपारी मंदिरात अर्पण करावी. त्याने तुमची अडलेली सर्व कामं सुरळीत होतील. अनेकदा अनेक प्रयत्न करून ही कामं होत नाहीत. त्यासाठी हा उपाय नक्की करून बघा. असं केल्याने कामं होतील.
3) धन लाभाचा उपाय
पुजेच्या वेळी सुपारीचा वापर केला जातो. पूजा केल्यानंतर सुपारी तुम्ही जिथे पैसे ठेवता अशा तिजोरीत ठेवा. सुपारी तुम्ही पैश्यांच्या कपाटात, तिजोरीत ठेवू शकता. त्यांने तुमची धन, संपत्ती वाढेल. सुपारीला रक्षासूत्रात गुंडाळून तिजोरीत ठेवावी.
4) व्यवसायात यशस्वी होण्यासाठी...
शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करा. त्यानंतर तिथे एक रूपया आणि एक सुपारी ठेवावी. दुसऱ्या दिवशी या पिंपळाच्या झाडावरून एक पान तोडा. त्यापानात सुपारी आणि एक रूपया बांधा. त्याला लाल धाग्याने बांधून ते तुमच्या तिजोरीत ठेवा. असं केल्याने व्यवसायात यश प्राप्त होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.