
थोडक्यात
16 जुलै 2025 रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार असून ज्यामुळे काही राशींना विशेष लाभ होणार आहे.
वृषभ, कर्क, सिंह आणि वृश्चिक राशींना करिअर, आर्थिक व वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल दिसतील.
सूर्यग्रहाच्या या गोचरामुळे नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढेल.
ज्योतिषशास्त्रात सूर्याला खास महत्त्व आहे. शास्त्रांनुसार, सूर्य आणि चंद्र हे असे देवता आहेत, जे थेट दिसतात. सूर्य देव दर महिन्याला आपली राशी बदलतात आणि या बदलाचा परिणाम सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. असं मानलं जातं की सूर्याच्या कृपेने व्यक्तीचे भाग्य जागृत होऊ शकते. यंदा 16 जुलै रोजी सूर्य देव मिथुन राशी सोडून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींवर सकारा्मक परिणाम होणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी कर्क राशीत सूर्याचे संक्रमण शुभ असणार आहे.