
Solar Eclipse 2025
Sakal
२१ सप्टेंबर रोजी होणारे आंशिक सूर्यग्रहण आध्यात्मिक शुद्धीकरणाची संधी आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात काही गोष्टी केल्यास शुभ फळे मिळू शकते.
या कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेऊया.
Solar Eclipse 2025 spiritual practices for prosperity: आज वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण लागणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असेल, ज्यामध्ये चंद्र सूर्याच्या एका भागाला झाकून टाकेल, ज्यामुळे तो चंद्रकोरीसारखा दिसेल. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात, सूर्याला आत्मा, ऊर्जा आणि जीवनशक्तीचे प्रतीक मानलं जातं. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे आणि जीवनात आत्मविश्वास, तेज आणि प्रतिष्ठा प्रदान करतो. जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा ग्रह आणि ताऱ्यांची स्थिती असामान्य होते आणि त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. शास्त्रांनुसार, हा काळ नकारात्मक उर्जेचा आहे, म्हणून तो अशुभ मानला जातो.