भारतामध्ये अनेक सणांच्या निमित्ताने महिलांमध्ये मेहेंदी लावण्याची परंपरा आहे. नागपंचमी, रक्षाबंधन, वटपौर्णिमा, आणि करवाचौथ या सणांच्या वेळी प्रत्येक घरात स्त्रिया आवडीने ही कला साकारताना दिसतात..आज करवाचौथ असल्यामुळे सर्व उत्तर भारतीय स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि सोळा शृंगार करतात. यात सर्वात आकर्षक असते ते म्हणजे आदल्या दिवशी लावलेली मेहेंदी. पण तुम्हाला माहित आहे का या मेहेंदीची खरी कहाणी काय आहे? अनेकांना वाटते की ही मेहेंदी मुघलांनी भारतात आणली, पण तसं नाहीये, यामागे एक वेगळं कारण आहे..Chikankari Art History : चिकनचा संबंध नाही! या मुघल राणीला जाते चिकनकारी कलेचे श्रेय, या प्राचीन भरतकाम कलेचा इतिहास काय?.पुराणात मेहेंदीचा उल्लेख नाही?प्राचीन भारतात महिलांनी हात पाय सजवण्यासाठी महावर किंवा आल्ता वापरायचे. पुराणांमध्ये सोळा शृंगाराचा उल्लेख करताना बांगड्या, कुंकू, गळ्यातला हार, झुमके, नाथ, कंबरपट्टा, सिंधूर आणि आल्त्याचा उल्लेख आढळतो, परंतु मेहेंदीचा उल्लेख कुठेही आढळत नाही. त्यामुळे असे मानले जाते की प्राचीन भारतात मेहेंदीचा वापर होत नव्हता..मेहेंदी भारतात आली कशी?तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मेहेंदीचा वापर सुमारे ५००० वर्षांपूर्वीपासून होत आहे. मिसरमधील ममींमध्ये याचे सर्वात जुने पुरावे आढळतात, जिथे केस, नखे आणि हात मेहंदीच्या तपकिरी-लाल रंगात रंगवलेले आढळतात. मग मेहेंदी भारतात कशी आली? इतिहासकारांच्या मते, मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिकेतून मेहेंदी भारतात आली. १२व्या शतकात सल्तनत कालीन मुस्लिमांनी भारतात तिचा परिचय करून दिला. सुरुवातीला फक्त मुस्लिम स्त्रिया ती वापरत असत, परंतु ती फार लोकप्रिय नव्हती..Shahu Maharaj: 'हे' दोन मराठा तरुण होते म्हणून औरंगजेब बालछत्रपतींचे धर्मांतर करु शकला नाही, जाणून घ्या त्यागाचा इतिहास.मुघल काळात मेहेंदीचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. मुघल स्त्रिया त्यांच्या हातांवर मेहेंदी लावत असत. हळूहळू हे प्रचलन हिंदू समाजातही पसरले आणि आल्त्याच्या जागी मेहेंदी आली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.