Navratri Festival : यंदा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असणार; पंचांगकर्ते दाते यांची माहिती, कधी होणार घटस्थापना?

Navratri festival Mohan Date : आश्विन शु. प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे गुरुवारी (ता. ३) नवरात्रारंभ म्हणजे घटस्थापना होणार आहे.
Navratri festival Mohan Date
Navratri festival Mohan Dateesakal
Updated on
Summary

विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे शनिवारी (ता. १२) असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.

सोलापूर : यावर्षी नवरात्र (Navratri Festival) दहा दिवसांचे असून गुरुवारी (ता. ३) सुरू होत आहे. शनिवारी (ता. १२) विजयादशमीचा विजय मुहूर्त दुपारी २.२२ ते ३.०९ या कालावधीत असणार आहे अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते (Mohan Date) यांनी दिली.

आश्विन शु. प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे गुरुवारी (ता. ३) नवरात्रारंभ म्हणजे घटस्थापना होणार आहे. या दिवशी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे सुमारे पहाटे ५ पासून दुपारी १.४५ पर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करता येईल.

या वर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांचे आहे. सोमवारी (ता.७) ललिता पंचमी असून गुरुवार (ता.१०) महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे. शुक्रवारी (ता.११) महाष्टमीचा व नवमी उपवास एकाच दिवशी आहे. शनिवारी (ता.१२) नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ती) आणि दसरा आहे. वयोमानामुळे किंवा आरोग्य विषयक अडचणींमुळे ज्यांना नवरात्रीचे ९ दिवस उपवास करणे शक्य नाही, त्यांनी उठता बसता म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा. मात्र ते ही शक्य नसल्यास किमान अष्टमीचा उपवास करावा.

Navratri festival Mohan Date
अंबाबाई मंदिरात प्लास्टिक पिशव्यांना पूर्णपणे बंदी; कर्मचाऱ्यांसह सुरक्षा रक्षकांना ओळखपत्रही असणार सक्तीचं!

काही अडचणींमुळे ज्यांना गुरवारी (ता. ३) घटस्थापना करणे शक्य होणार नाही त्यांनी शनिवारी (ता. ५), मंगळवार (ता. ८), गुरुवार (ता.१०), शुक्रवार (ता. ११) यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व शनिवारी (ता. १२) नवरात्रोत्थापन करावे. महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी गुरुवार (ता. १०) मध्यरात्री मिळते. त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मीपूजन दिलेले आहे. मात्र दुर्गाष्टमी शुक्रवारी (ता. ११) आहे.

Navratri festival Mohan Date
Shardiya Navratri : अंबाबाईच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण; मंदिर परिसरात कडक सुरक्षायंत्रणा

विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे शनिवारी (ता. १२) असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी २.२२ ते ३.०९ या दरम्यान आहे असे श्री. दाते यांनी कळवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.