esakal | दिनविशेष -9 ऑक्टोबर, इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?
sakal

बोलून बातमी शोधा

दिनविशेष -9 ऑक्टोबर, इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?

दिनविशेष -9 ऑक्टोबर, इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

पंचाग शनिवार : आश्विन शुद्ध ३/४, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय सकाळी ९.०९, चंद्रास्त रात्री ८.४३, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१५, विनायक चतुर्थी, सप्तरोत्रोत्सवारंभ, भारतीय सौर आश्विन १७ शके १९४३.

दिनविशेष - 9 ऑक्टोबर 2021

जागतिक टपाल कार्यालय दिन

२०००- महाराष्ट्राचा धावपटू सचिन नवले याने कलकत्ता येथे झालेल्या ४०व्या राष्ट्रीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत प्रतिष्ठेची १०० मीटर शर्यत फोटोफिनिशमध्ये जिंकून सर्वाधिक वेगवान धावपटूचा किताब मिळविला.

२००६ - अमेरिकेसह जगाचा दबाव धुडकावून लावून उत्तर कोरियाने पहिल्या अणुबॉंबची यशस्वी भूमिगत चाचणी घेतली.

२००७ - संगणकात माहिती साठविण्याची क्षमता काही पटींनी वाढण्यास उपयुक्त ठरलेल्या ‘जायंट मॅग्नेटोरेझिस्टन्स’ (मोठ्या प्रमाणावरील चुंबकीय रोध - ‘जीएमआर’) या क्षेत्रामध्ये संशोधन करणारे फ्रान्सचे अल्बर्ट फर्ट आणि जर्मनीचे पीटर ग्रुनबर्ग या दोघा शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर.

२००९ - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर. जगाला चांगल्या भवितव्याची आशा दाखविल्याबद्दल आणि अण्वस्त्रबंदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल ओबामा यांना हे पारितोषिक जाहीर करण्यात आले.

loading image
go to top