Eclipse in 2022 : यंदा 4 ग्रहण दिसणार, 2 खंडग्रास सुर्यग्रहण, 2 खग्रास चंद्रग्रहण

Eclipse in 2022 in India
Eclipse in 2022 in India

Total Eclipse in 2022 :ज्योतिषविद्या आणि खगोलशास्त्रानुसार या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये दोन आंशिक सूर्यग्रहण आणि दोन पूर्ण चंद्रग्रहण(2 solar partial 2 eclipses lunar होणार आहे. एप्रिलमध्ये होणारे सूर्य ग्रहण देशात दिसणार नाही तर ऑक्टोबरमध्ये दिसणारे सुर्यग्रहण भारतामध्ये काही ठिकाणी दिसणार आहे, त्यामुळे त्याला धार्मिक महत्त्व असेल. त्याशिवाय मे महिन्यात होणारे पूर्ण चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाही तर नोव्हेंबरमध्ये होणारे चंद्रग्रहण देशातील कित्येक भागांमध्ये काही काळासाठी दिसेल. हे ग्रहण ज्या ठिकाणी दिसेल तिथे त्याचे धार्मिक महत्त्व पाळले जाईल. (Total 4 Eclipse in 2022 in which 2 solar partial 2 eclipses lunar Eclipse)

Eclipse in 2022 in India
यशस्वी करिअरसाठी Communication skills गरजेचे

दोन खंडग्रास सुर्यग्रहण, एक दिसणार भारतात (Solar Eclipse in India)

खंडग्रास सुर्यग्रहण 30 एप्रिल शनिवार : हे सुर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही पण उत्तर आणि दक्षिण अमेरिका प्रशांत आणि अटलांटिक महासागरातील दक्षिणी भागामध्ये हे ग्रहण दिसणार आहे. त्यामुळे त्या भागातील काही ठिकाणी ग्रहणाचा परिणाम होईल. भारतीय वेळेनुसार खग्रास सुर्यग्रहण 12.15 ला सुरू होणार असून सकाळ 04.07 वाजता संपणार आहे. हे ग्रहण साधारण 4 तास असेल.

खंडग्रास सुर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022, मंगळवार : हे सुर्यग्रहण दिवाळीच्या पुढच्या दिवशी असणार आहे, जे लोक भारतामध्ये दिसणार आहे. या ग्रहणाला धार्मिक महत्त्व असून दिवाळीला होणाऱ्या लक्ष्मीपूजनावर त्याचा परिणाम होणार नाही. तसेच हे ग्रहण यूरोप, उत्तरी अफ्रिका, पश्चिम एशिया, उत्तरी अटलांटिका महासागर, उत्तर हिंद महासागर दिसणार आहे. भारतीय वेळेनुसार हे खंडग्रास सुर्यग्रहण साधारण दुपारच्यावेळी 02:28 ला सुरू होणार असून 6:32 ला संपणार आहे.

Eclipse in 2022 in India
आजचे पंचांग, दिनविशेष आणि दिनमान - 04 जानेवारी 2022

दोन खग्रास चंद्रग्र्हण; भारतात एक ग्रहण दिसणार

खग्रास चंद्रग्रहण १६ मे २०२२ सोमवार : हे पूर्ण चंद्रग्रहण आहे पण सकाळी सुरू होऊन सकाळीच संपणार आहे. त्यामुळे भारतामध्ये ते दिसणार नाही. हे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार सकाळी ७.५७ ला सुरू होईल आणि ११.२५ ला संपेल. साधारण तीन तासाचे चंद्रग्रहण पश्चिम यूरोप, अफ्रिकातेल पूर्व आणि मध्य भागात, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, अटलांटिक आणि प्रशांत महासागर मध्ये दिसणार आहे.

खग्रास चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर 2022, मंगळवार : हा दिवस कार्तिक पोर्णिमेचा असून त्यादिवशी चंद्रग्रहण होणार आहे, जे भारतात दिसणार आहे. त्यामुळे त्याचे धार्मिक महत्त्व असेल पण हे चंद्रग्रहण दिवसा सूरू होणार असून चंद्रउद्यानंतर थोड्याच वेळात संपणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी साधारण २.३८ ला सुरू होईल आणि रात्री ६.१९ पर्यंत सुरू राहिल. भारत सोडून हे ग्रहण उत्तर आणि दक्षिण अमेरिका, ऑस्टेलिया आणि उत्तर प्रशांत महासागर आणि हिंद महासागरमध्ये दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com