Tulsi Mala Niyam : वारकरी संप्रदायात मानाचं स्थान असलेल्या तुळशीमाळेला घालताना 'या' चुका कधीही करू नका नाहीतर.. | Tulsi mala Niyam rules of wearing tulsi mala Warkari sampradaya read story | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tulsimala Niyam

Tulsi Mala Niyam : वारकरी संप्रदायात मानाचं स्थान असलेल्या तुळशीमाळेला घालताना 'या' चुका कधीही करू नका नाहीतर..

Tulsimala Niyam : हिंदू धर्मात तुळशीमाळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असं म्हणतात की तुळशीचं रोपटं ज्या घरी असतं तिथे माता लक्ष्मी वास होता है. तुळशीमाळेसोबत जर भगवान विष्णुच्या मंत्राचा जाप केल्यास पुण्य मिळतं.

असं म्हणतात की तुळशीमाळेने जाप केल्यास भगवान श्री हरि लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

एवढंच काय तर देशात नावलौकीक असणाऱ्या आणि महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या वारकरी संप्रदायात तुळशीमाळेला मानाचं स्थान आहे. या माळेला गळ्यात घातल्यानंतर मन आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतं.

सोबत सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो पण तुळशीमाळेला घालताना काही चुका कधीही करू नये. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत. (Tulsi mala Niyam rules of wearing tulsi mala Warkari sampradaya read story )

ज्योतिषशास्त्रानुसार जाप करणारी माळ आणि गळ्यात घालणारी माळ एक नसते. या दोन्ही वेगवेगळ्या असतात. सोबतच जे लोक गळ्यात तुळशीची माळ घालतात त्यांना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

जर या गोष्टीची काळजी घेतली तर माता लक्ष्मी आणि श्री हरि नाराज होत नाही. चला तर जाणून घेऊया तुळशी माळ धारण करताना कोणते नियम पाळावे?

तुळशीमाळेला घालताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या

- ज्योतिषशास्त्रानुसार तुळशी दोन प्रकारच्या असतात. एक रामा तुळशी आणि दुसरी श्यामा श्यामा तुळशी. या दोन्ही प्रकारच्या वेगवेगळ्या तुळशी असतात.

- असं म्हणतात की तुळशीमाळेला धारण केल्यानंतर कडक नियमाचं पालन करावे. या व्यक्तीने सात्विक जेवण करावे. मास-मदिरापासून दूर रहावे. सोबतच लसून कांदा इत्यादीचं सेवन करू नये.

- असंही म्हणतात की एकदा तुम्ही तुळशीमाळ घातली तर पुन्हा कधीच काढू नये.

- तुळशीमाळेला घालताना चांगल्याने गंगाजलने धुवावे. त्यानंतर हे माळ सुखल्यावर ही माळ घालावी.

- असं ही म्हणतात की तुळशीमाळेला धारण करताना चुकूनही रुद्राक्ष धारण करू नये. यामुळे अशुभ फलप्राप्ती होते.

- जर तुम्ही तुळशीची माळ गळ्यात धारण केली नाही तर उजव्या हातात घालू शकता. मात्र नित्य क्रिया आधी ही माळ काढून ठेवावी. त्यानंतर अंघोळीनंतर तुम्ही ही माळ गंगाजलनी धुवून पुन्हा धारण करावी.

टॅग्स :wariwarkariTulsiSanskruti