

Umbartha Vastu Shastra
sakal
WHY IS TURMERIC APPLIED TO THE MAIN DOOR THRESHOLD: वास्तुशास्त्राच्या परंपरेत घराच्या प्रवेशद्वाराला आणि उंबरठ्याला विशेष स्थान दिले जाते. घराच्या आत आणि बाहेरील जग यांच्यामधील सीमारेषा म्हणून उंबरठ्याकडे पाहिले जाते. बहुतेक घरांमध्ये तर उंबरठ्यावर हळदीचे लेपन केलेले दिसते. उंबरठा स्वच्छ ठेवणे, त्यावर हळद-कुंकू लावणे किंवा हळदीचे पाणी शिंपडणे ही प्रथा अनेक कुटुंबांमध्ये आजही पाळली जाते. पण या परंपरेमागे नेमकं कारण काय? आणि वास्तुशास्त्रानुसार या पंरपरेला इतकं का महत्त्व दिलं जातं जाणून घेऊया.