
Diwali Traditions of India: हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. संपूर्ण भारतभर हा सण खूप जल्लोषात आणि आनंदात साजरा केला जातो. भारत विविधतेने नटलेला देश आहे त्यामुळे महाराष्ट्रात जरी ५ दिवसांची दिवाळी साजरी होत असली, तरी भारतातील इतर राज्यात वेगवेगळ्या प्रकारे दिवाळी साजरी होते.
काही ठिकाणी देवी-देवतांची पूजा होते, तर काही ठिकाणी पूर्वजांना आठवणाऱ्या सोहळ्यांमुळे दिवाळी अधिक भावनिक बनते. फटाक्यांची आतिशबाजी, घाटांवर आणि नदिपात्रात दिव्यांचा उजळून टाकणारा लख्ख प्रकाश, लोककला, आणि नातेवाईक-मित्रपरिवार यांच्या भेटीगाठी; ह्या सगळ्यांनी दिवाळीला अनोखा अनुभव मिळतो.
अशाच काही भारतातील खास दिवाळीच्या परंपरा आपण पाहूया ज्या केवळ त्या ठिकाणीच पाहायला मिळतात: