

Unique Dussehra Traditions: Places in India Where Ravan Is Worshipped
esakal
Vijayadashami Traditions: दशमीच्या दिवशी देशभरात रावणाचा पुतळा जाळून विजयादशमीचा सण साजरा करण्याची परंपरा आहे. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भारतामध्ये काही अशी ठिकाणे आणि गावे आहेत जिथे रावण दहन करणे अशुभ किंवा अपमानास्पद मानले जाते. या विशिष्ट भागांमध्ये रावणाला वाईट प्रवृत्तीचा असुर मानण्याऐवजी एक महाविद्वान पंडित, शिवभक्त आणि काही ठिकाणी तर आपला 'जावई' म्हणून आदराचे स्थान दिले जाते. विजयादशमीच्या या खास प्रसंगी देशातील अशाच काही निवडक आणि अनोख्या ठिकाणांविषयी सविस्तर जाणून घेऊया.