Ram Navami 2025: 'या' गावात का साजरा होतो राम आणि सीतेचा विवाह?

Ram Navami Celebrations: भद्राचलममध्ये राम नवमीला साजरा होणारा सीता-राम विवाह सोहळा ही भक्ती आणि परंपरेची एक आगळीवेगळी अनुभूती आहे.
Ram Navami 2025
Ram Navami 2025Sakal
Updated on

The Sacred Marriage Ceremony of Ram and Sita: राम नवमी दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला साजरी केली जाते. संपूर्ण देशभरात हा सण मोठ्या जल्लोषात, आनंदात आणि श्रद्धेने साजरा केला जातो. रामभक्त मनोभावे श्रीरामाची पूजा अर्चना करतात. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

मंदिरांमध्ये भजन, कीर्तनेही गायली जातात. असेच तेलंगणामधील भद्रचलम येथील एका प्रसिद्ध मंदिरात एका वेगळ्या तऱ्हेने राम नवमी साजरी केली जाते. चला तर मग जाणून घेऊया या मंदिराची, राम नवमी साजरी करण्याची आगळीवेगळी पद्धत.

राम नवमी (Ram Navami)

हिंदू धर्मांमधील अनेक महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे राम नवमी हा सण. वैदिक पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला प्रभू श्रीरामाचा जन्म झाला. म्हणजेच हा प्रभू श्रीरामाचा जन्मदिवस. पौराणिक कथेनुसार, त्रेता युगात भगवान विष्णूंनी धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि राक्षसांचा विनाश करण्यासाठी श्रीरामाच्या रूपात अवतार घेतला होता.

Ram Navami 2025
Ram Navami 2025: यंदा 5 की 6 एप्रिल कधी आहे रामनवमी ? जाणून घ्या शुभ मुहूर्त,पूजा विधी अन् महत्त्व

श्रीराम जन्मभूमीत म्हणजेच अयोध्येमध्ये राम नवमीला रामजन्मोत्सव खूप उत्साहात साजरा केला जातो. देशातील इतर ठिकाणीही राम नवमी प्रभू श्रीरामाचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते. परंतु तेलंगणामधील भद्रचलम गावातील श्री सीतारामचंद्रस्वामी मंदिरात (Sita Ramachandraswamy Temple) राम नवमी वेगळ्याच कारणासाठी साजरी केली जाते. याचमुळे हे मंदिर खास प्रसिद्ध आहे.

श्री सीतारामचंद्रस्वामी मंदिर भद्रचलम

भद्रचलम (Bhadrachalam) हे गाव "दक्षिणेची अयोध्या" म्हणून ओळखले जाते. येथील श्री सीतारामचंद्रस्वामी मंदिर राम नवमीच्या विशेष परंपरेमुळे प्रसिद्ध आहे. येथील "कल्याणमहोत्सव" म्हणजेच प्रभू श्रीराम आणि माता सीतेचा भव्य विवाहसोहळा राम नवमीचे मुख्य आकर्षण असते. लाखो भाविक या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित राहतात.

या विवाहसोहळ्यानिमित्त मंदिरात प्रभू श्रीराम आणि माता सीतेला "पट्टू वस्त्रं" (रेशमी वस्त्र) आणि "मुत्याळा तालांब्रोलू" (मोत्यांचे तोरण) अर्पण करण्याची परंपरा आहे. या शुभ दिनी संपूर्ण मंदिर फुलांनी आणि दिव्यांनी सजवले जाते. याव्यतिरिक्त गावात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि भजन-कीर्तनांचे आयोजन केले जाते. तसेच तेथील देवतांची भव्य मिरवणूकही काढली जाते. यामुळे संपूर्ण भद्रचलम गावात अतिशय भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

Ram Navami 2025
Ram Navami 2025: सर्वार्थ सिद्धीसोबतच राम नवमीला अनेक शुभ योग तयार होत आहेत, 'हे' उपाय केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होईल

फक्त उत्सवाच्या हेतूनेच नाही तर, प्रभू श्रीराम आणि सीतेने दिलेल्या सन्मान, प्रेम, कर्तव्य आणि निष्ठा या मूल्यांची आठवण करून देण्यासाठी देखील हा उत्सव साजरा केला जातो. पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न होतो, दरम्यान पुजारी पवित्र मंत्रोच्चार करतात आणि उपस्थित भक्त श्रीराम-सीता विवाहाचे साक्षीदार होत त्यांना आशीर्वाद देतात.

संपूर्ण सोहळा सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत पार पडतो, आणि दुपारी १२ वाजता देवतांवर पवित्र 'तालांब्रोलू' (अक्षता) चा वर्षाव केला जातो. हा सोहळा भक्तांसाठी केवळ एक धार्मिक विधी नसून, भक्तिभावाने भारलेला एक पवित्र आणि आल्हाददायक अनुभव असतो.

संपूर्ण सोहळा सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत पार पडतो, आणि दुपारी १२ वाजता देवतांवर पवित्र 'तालांब्रोलू' (अक्षता) चा वर्षाव केला जातो. हा केवळ एक धार्मिक विधी नसून, भक्तांसाठी आध्यात्मिक भक्तिभावाने भरलेला आणि मनाला आनंद देणारा क्षण असतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com