
Devotees in Satara observe the rare “Standing Navratri” ritual, staying upright for nine days. A unique viral news story from satara.
esakal
सध्या देशभरात शारदीय नवरात्र महोत्सव सुरू आहे. घरोघरी घटस्थापना करून देवीची पूजा-अर्चा केली जाते. सार्वजनिक ठिकाणीही देवीच्या विविध रुपांची स्थापना केली जाते. नवरात्रौत्सवाच्या या नऊ दिवसांत अनेक भक्त उपवास करतात. उपवास करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. काहीजण नऊ दिवस उपवास करून एक वेळ जेवतात, तर काही केवळ उपवासाचं अन्न घेतात. जे कडक उपवास करतात ते नऊ दिवस चप्पलही वापरत नाहीत. अशा विविध पद्धतींनी भक्त देवीची सेवा करतात.