Vastu Tips :‘हे’ रोपटं ठेवल्यानं घरात नांदेल लक्ष्मी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vastu tips

Vastu Tips :‘हे’ रोपटं ठेवल्यानं घरात नांदेल लक्ष्मी

पुणे : पुर्वी आजी-आजोबा घरात कोणती गोष्ट कोठे ठेवावी, ती कोणत्या दिशेला तोंड करून असावी हे सांगायचे.आजही खेडेगावात घरे जुनी असली तरी तेथे सुख समृद्धी नांदते. वास्तूशास्त्राने काही नियम सांगितले आहेत. या नियमांचे पालन योग्य पद्धतीने केले तर आपल्या रोजच्या आयुष्यातील अनेक अडचणी दुर होतील. पण, या गोष्टींबद्दल फारशी माहीती नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

हेही वाचा: Vastu Tips : नवरात्रीत ‘ही’ वस्तू घरी आणणे ठरेल फायदेशीर ;फक्त ही चूक टाळा

कोकणातील घरांना मोठे अंगण आणि त्यात तुम्हाला माहीतीही नसतील अशी वेगवेगळी झाडे असतात. कोकणाचे निसर्ग सौंदर्य बाजूला ठेऊन विचार केला तर ती झाडे त्या घरात आनंद कायम राखण्याचे काम करतात. तशीच काही झाडे आपल्या घरात लावल्याने घरातील अडचणी दुर होण्यास मदत होते.

नियमानुसार घरात तुळस, मनी प्लांट ही झाडे तर असावीच. पण त्याच बरोबर क्रॅसुला(Crassula) हे छोटे रोपटेही ठेवावे. हे रोपटे घरात योग्य जागी ठेवल्याने लक्ष्मी मातेचा वास राहतो.

हेही वाचा: Vastu Tips : तुम्हीही आर्थिक संकटाचा सामना करत आहात का? आजच करा 'हे' वास्तु उपाय

कोणत्या दिशेला असावे क्रॅसुला

वास्तुशास्त्रानुसार, क्रॅसुलाचे रोप नेहमी तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावे. क्रॅसुलाचे रोपटे नैसर्गिक हवा शुद्ध करून कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. घर आणि ऑफिसच्या योग्य दिशेला ही रोपे ठेवल्यास वास्तुदोष तर दूर होतात.

क्रॅसुला मेन दरवाजापासून दूर ठेवा

क्रॅसुला वनस्पती आपल्या मेन दरवाजापासून दूर ठेवावी. मेन दरवाजा ऊर्जेचा स्त्रोत मानला जातो. त्यामुळे हे झाड मेन दारात ठेवल्याने पैसे येण्याचा प्रवाह थांबू शकतो. त्यामुळे कोणाला अडथळा ठरणार नाही अशा ठिकाणी क्रासुलाप्लांट लावा. घराच्या दिवाणखान्यात ठेवणे शुभ असते.

हेही वाचा: Vastu Tips : स्वयंपाकघरासंबंधी 'या' वास्तु टिप्सचे करा पालन, घरी सुख-समृद्धी नांदेल

ऑफिसमध्ये योग्य जागा

ऑफिसमध्ये टेंशन फ्री राहण्यासाठी, नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी तुम्ही हे प्लांट तुमच्या डेस्कच्या,केबीनच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवा. बिझनेसमध्ये नफा मिळवण्यासाठी ते तुमच्या कॅश काउंटरच्या वर ठेवा.

बेडरूममध्ये क्रॅसुला रोपटं ठेवू नका

तुमच्या बेडरूममध्ये क्रॅसुला प्लांट लावू नका. बेडरूममध्ये आराम केला जातो. त्यामुळे येथे कोणतीही रोपे न लावण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, क्रॅसुला स्वयंपाकघरातही न लावण्याचा सल्ला दिला जातो.

हेही वाचा: Vastu : ग्रहदोष, वास्तूदोष घालवतो कापूर

अंधारात क्रॅसुला रोपटं नकोच

क्रॅसुलाचे रोपटे घरामध्ये अंधाराच्या ठिकाणी ठेवले तर त्यातून नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. त्यामुळे हे रोज नेहमी अशा ठिकाणी ठेवावी जिथे चांगला सूर्यप्रकाश असेल. घराच्या बाल्कनीत आणि टेरेसमध्ये ही वनस्पती ठेवल्यास नक्की फायदा होतो.

रोपट्याची काळजी घ्या

वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही घरामध्ये क्रॅसुला रोप लावणार असाल तर हे लक्षात ठेवा की त्याची पाने नेहमी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावीत. झाडावर धुळ जमणार नाही याची काळजी घ्या.