Vastu Tips : नवरात्रीत ‘ही’ वस्तू घरी आणणे ठरेल फायदेशीर ;फक्त या चुका करू नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

navratri festival

Vastu Tips : नवरात्रीत ‘ही’ वस्तू घरी आणणे ठरेल फायदेशीर ;फक्त ही चूक टाळा

पुणे : अनेकदा ऑफिसमध्ये घरामध्ये हत्तीची मुर्ती ठेवल्याचे दिसते.काही ठिकाणी शोपिस म्हणून तर काही ठिकाणी वास्तूशास्त्र नियमाप्रमाणे हत्ती ठेवण्याचा सल्ला दिला जातो. त्याचे अनेक फायदे आहेत. सध्या नवरात्री सुरू असून देवीची पूजा उत्साहात पार पडत आहे. यावर्षी देवी हत्तीवर स्वार होऊन आली आहे. याला शुभसंकेत मानला जातो.

दुर्गा माता हत्तीवरून आली म्हणजे येणारे वर्ष सुख समृद्धीने भरलेले असेल असे मानले जाते. त्यामुळे घरात शांती समाधान रहावे, लक्ष्मी माता प्रसन्न व्हावी असे वाटत असेल तर नवरात्रीच्या नऊ दिवसात घरात हत्तीची प्रतिमा ठेवण्याचा सल्ला वास्तूशास्त्र देते.घरात हत्ती कुठे ठेवावेत, ते कोणत्या धातूचे असावेत, याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.

पितळेचा हत्ती

शास्त्रानुसार घराच्या हॉलमध्ये पितळ धातूची हत्तीची लहान आकारातील मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. पितळी हत्ती मुलांच्या तुमच्या यशाचा मार्ग खुला करतात.

हत्तीचा फोटो

घराच्या राहत्या जागेत हत्तीचे चित्र किंवा पुतळा ठेवल्यास घरात लक्ष्मीचा वास राहतो. आर्थीक अडचणी दूर होतात. हत्तीची मूर्ती किंवा फोटोत हत्तीची सोंड वरच्या दिशेला असावी. यामुळे घरात सुख-शांती नांदते. उत्तर दिशेला तोंड करून हत्तीची मूर्ती ठेवावी.

चांदीचा हत्ती

घरामध्ये पैशाच्या किंवा तिजोरीच्या कपाटात चांदीचा हत्ती ठेवणे देखील लाभदायक असते. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहुचा त्रास असेल तर त्यावर ही हत्तीची मूर्ती घरात ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

घराच्या बेडरूममध्ये हत्तीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. असे केल्याने पती-पत्नी यांच्यात प्रेम कायम राहते. तसेच नवरा-बायकोमध्ये वाद-विवाद होत नाहीत. घरात हत्तीच्या पिल्लाची मूर्ती ठेवणेही शुभ मानले जाते. तसेच संतान प्राप्तीसाठी बेडरूममध्ये सात हत्ती ठेवले पाहिजेत.

घरात हत्ती कुठे ठेवू नयेत?

हत्तीची मुर्ती दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू नये. दुकानात हत्तीची सोंड खाली असेलेली मुर्ती ठेऊ नका. घरात प्लास्टिक किंवा प्लास्टरचा हत्ती ठेवू नका. घरात हत्तीची जोडी ठेवताना त्यांचे चेहरे एकमेकांकडे असतील असे ठेवा.