Vastu Tips : 'या' मंत्रांच्या नियमित जपाने आयुष्यात येते सुख-समृद्धी

या मंत्रांचा जप केल्याने घरात सुख-समृद्धी येते. जाणून घ्या हे प्रभावी मंत्र
Vastu Tips
Vastu Tipsesakal

Mantra for Wealthy Life : सनातन धर्मात उपासना आणि मंत्रजपाचे विशेष महत्त्व आहे. कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीपासून ते जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत एक विशेष मंत्र सांगण्यात आला आहे. इतकेच नाही तर व्यक्तीच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी मंत्राचा जप शुभ मानला जातो.

Vastu Tips
Vastu Tips: झाडू कधी विकत घ्यावा; घराच्या सुख-समृद्धीसाठी पाळा हे नियम

तुम्हालाही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यश मिळवायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला काही अत्यंत प्रभावी मंत्रांबद्दल सांगणार आहोत. या मंत्रांचा नियमित जप केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच त्याला समाजात मान-सन्मान मिळतो.

Vastu Tips
Vastu Tips : घरातील मोरपिस योग्य दिशेला लावलंय ना?, असल्यास भाग्य उजळेल

आर्थिक समृद्धीसाठी मंत्र

संपत्ती मिळविण्यासाठी व्यक्तीने देवी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे. मातेची पूजा करताना "ॐ श्रीं ऐं ॐ" या मंत्राचा जप केल्याने देवी प्रसन्न होते. या मंत्राचा जप रोज संध्याकाळी दिवा लावून करावा. मनुष्याने आपल्या इच्छेनुसार देवी लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी या मंत्राचा ११, २१ किंवा १०८ वेळा जप करावा.

Vastu Tips
Vastu : ग्रहदोष, वास्तूदोष घालवतो कापूर

इच्छा पूर्ण करण्याचा मंत्र

कोणत्याही प्रकारची इच्छा पूर्ण करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप खूप प्रभावी मानला जातो. महामृत्युंजयाच्या मंत्राचा जप केल्याने मनातील सर्व भीती दूर होते. या मंत्राचा जप केल्याने मन शक्तिशाली होते.

Vastu Tips
Vastu Tips : एक्वॅरियममध्ये किती मासे असावेत ; गोल्डन फिशबद्दलचे नियम जाणून घ्या

सुख आणि समृद्धीसाठी मंत्र

“ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ”

या मंत्राचा जप केल्याने घरात सुख-समृद्धी येते. सकाळी उठल्यावर आणि स्नान केल्यानंतर या मंत्राचा नियमित जप करावा. या मंत्राचा जप केल्याने घरात सकारात्मकता येते आणि व्यक्तीच्या मनातील भीती दूर जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com