
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराची उत्तर दिशा अत्यंत शुभ मानली जाते. या दिशेला देवतांचा वास असतो.. अशी श्रद्धा आहे. म्हणूनच, श्रीमंत आणि यशस्वी लोक त्यांच्या घराच्या उत्तर दिशेला विशेष महत्त्व देतात.
उत्तर दिशेला शुभ वस्तू ठेवल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. यामुळे घरात धन, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. म्हणूनच जे लोक या वास्तु नियमाचे पालन करतात, त्यांच्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते, अशी श्रद्धा आहे.