Vastu tips : पती-पत्नीतील संबध बिघडलेत; ही फुले काढतील अडचणीतून बाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vastu tips

Vastu tips : पती-पत्नीतील संबध बिघडलेत; ही फुले काढतील अडचणीतून बाहेर

पुणे : आयुष्यात प्रत्येकालाच सुख शांती आणि समृद्धी हवी असते. जो तो त्याच्यामागे पळत असतो. पण कोणालाच यामागील उत्तर सापडत नाही. त्यामुळे अडचणी कमी होण्यापेक्षा वाढत जातात. तुमच्या प्रत्येक समस्येवर वास्तुशास्त्रामध्ये उपाय सांगण्यात आले आहेत. ते जर तुम्ही केले. तर तुमच्या जीवनात नक्कीच फरक पडू शकेल.

हेही वाचा: Vastu Tips : नैवेद्य संबंधित करू नका या चुका, येईल गरीबी

वास्तुत काही बदल केल्यामुळे पती-पत्नीतील बिघडलेले संबंध सुधारू शकतात. त्यासाठी खास काही करण्याची गरज नाहीये. घरात केलेले छोटेसे बदल तुम्हाला जगण्याचा एक नवीन मार्ग दाखवू शकतात. आज आपण एका विशिष्ट रंगाच्या फुलाच्या उपायाबद्दल जाणून घेणार आहोत.

हेही वाचा: Vastu Tips : तुम्हीही जेवल्यावर ताटात हात धुताय? भोगावे लागतील गंभीर परिणाम

पंडित इंद्रमणी घनशाल यांच्यामते, विशिष्ट प्रकारच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरात लावलेली काही फुले पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करतात. त्यामुळे घरातील वातावरण नेहमी प्रसन्न राहते. वास्तुशास्त्रानुसार घरात पिवळ्या रंगाचे फुलांचे झाड लावल्यास फायदा होतो. हे झाड बेडरूममधील दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात ठेवावे. यामुळे घरातील शांतता टिकून राहते. आणि घरातील सदस्यांच्या सदस्या बिघडलेले संबंध व्यवस्थित होतात.

हेही वाचा: Vastu Tips : तुम्हीही जोडिदाराच्या ताटातच जेवतात? सावधान...

कमळाचे फूल हे माता लक्ष्मी आणि माता सरस्वतींना प्रीय असते, तसेच, पिवळ्या रंगाचे फुल हे समर्पण त्याग आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच घरातील उत्तर-पूर्व दिशेला पिवळ्या रंगाचे फुल ठेवणे शुभ मानले जाते.

हेही वाचा: Vastu Tips : ‘घड्याळ’अशा पद्धतीने घातलं तर बदलेल नशीब

तुम्ही कोणत्याही प्रकारची फुलं घरात लावू शकता पण पिवळ्या रंगाच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे छोट्या कुंडीत पिवळ्या रंगाच्या फुलाचे झाड लावून ती मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ठेवावी. ऑफिसमध्येही फायदा होण्यासाठी हे झाड मेनगेटवर ठेवावे.