Vel Amavasya: वेळ अमावस्या हिवाळ्यात का साजरी करतात?

पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. या दिवशी मातीची लक्ष्मीची मुर्ती तयार केली जाते.
Vel Amavasya
Vel AmavasyaEsakal
Updated on

Vel Amavasya 2022: भारत कृषीप्रधान देश असल्याने देशात शेतीशी संबंधीत अनके सण, उत्साव साजरे होतात. यातीलचं एक सण म्हणजे वेळ अमावस्या. मराठवाड्यात दरवर्षी या सणाचा एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय. या सणानिमित्त दरवर्षी शेतातील काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी तिची पूजा केली जाते. मूळ कर्नाटकी असणारा हा सण महाराष्ट्रात उस्मानाबाद, लातूर, सोलापूर आणि परळीचा उर्वरित भागात साजरा होतो. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. या दिवशी मातीची लक्ष्मीची मुर्ती तयार केली जाते. 

गावातील सर्व थोर, लहान शेतात गोळा होत या काळ्या आईची पूजा करतात. तिला गोडाधोडाचा नैवद्य दाखवत आणि वनभोजनाचा आनंद लुटत असतात. वेळ अमावस्येला बोली भाषेत येळवस असेही म्हटले जाते. यावेळी शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो. तसेच रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी, करडई, सुर्यफुल आदी पिकात चर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे, अशी देवीकडे प्रार्थना केली जाते.

वेळ अमावस्या म्हणजे काय?पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला वेळ अमावस्येचा उत्सव होतो. ही सातवी अमावस्या डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीच्या पंधरवाड्यात येते. यावेळी रब्बी हंगामातील पेरणी होऊन शेत पूर्ण हिरव्यागार पिकांनी डोलत असतं. यावेळी बोचणारे ऊनही नसते. मात्र ही वेळ अमावस्या केव्हा सुरु झाली याची नोंद नाही. वेळ अमावस्येच्या दिवशी लातूरमध्ये रस्त्यांवर कर्फ्यूसारखे वातावरण असते.

Vel Amavasya
Winter Recipe: हिवाळ्यात आरोग्यासाठी पौष्टिक असणारी गूळ पापडी कशी तयार करायची?

वेळ अमावस्या हिवाळ्यातच का साजरी होते?

उत्साह आणि नवचैतन्य निर्माण करणारा ऋतू म्हणून हिवाळा मानला जातो. आयुर्वेदानुसार, हिवाळा ऋतूनुसार घेतला जाणारा आहार शरीरास पोषक असतो. त्यामुळे तब्येतही तंदुरुस्त राहते. या दिवसांत फळ आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूत प्रचंड भूक लागते तसेच पचनसंस्था चांगली राहते. शरीर कोरडं आणि रुक्ष पडू नये यासाठी अनेकदा स्निग्ध पदार्थ्यांची आवश्यकता असते. त्यामुळे या दिवसांत दूध, तूप, दहीस लोणी यांचा आहारात समावेश करावा. यामुळे वेळ अमावस्याला बाजरीची भाकरी आणि गरम पदार्थ्यांची घरोघरी एक मेजवानी असते. त्य़ामुळे दूरवरून लोकं लातूरमध्ये वेळ अमावस्या साजरी करण्यासाठी येत असतात.

Vel Amavasya
Paush Amavasya 2022 : वर्षातील शेवटची अमावस्या आहे खूप खास; या गोष्टी दान केल्यास मिळेल पुण्य...

वेळ अमावस्येला प्रामुख्याने कोणते पदार्थ तयार करतात?

वेळ अमावस्येला डाळीच्या पिठात विविध भाज्यांची मिसळ करुन तयार केलेली भज्जी हा मानाचा पदार्थ असतो. भज्जीसाठी हिरवी मटार, हरभरा, वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगातील हिरवे दाणे, काकडी किंवा वाळूक, वांगी, मेथीचा पाला, कोथिंबीर, कांदापात, लसुणपात, आले, शेंगदाणे, हिरवी चिंच, गाजराचा वापर केला जातो. ज्वारी भरड्याचा आंबड भात, तांदळाची खीर, भात, ज्वारी अन् बाजरीचे उंडे, ज्वारी, बाजारीची भाकरी, तुरीचे फिके वरण या शिवाय बरेच जण धपाटे, तिळाच्या पोळ्याही करतात.वेळ अमावस्येचे विशेष आकर्षण असते ते म्हणजे आंबील. चार-पाच दिवसांच्या आंबट दह्याचे ताक केले जाते. त्यात थोडेचे ज्वारी पीठ शिजवून टाकले जाते. मीठ, जिरेपूड, कोथिंबीर, आले, लसणाचे वाटण अन् मिरची पावडर त्यात कच्चेच टाकतात. ती नव्या मडक्यात ठेवतात. तत्पूर्वी मडके काव-चुन्याने रंगवले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com