Paush Amavasya 2022 : वर्षातील शेवटची अमावस्या आहे खूप खास; या गोष्टी दान केल्यास मिळेल पुण्य... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paush Amavasya 2022

Paush Amavasya 2022 : वर्षातील शेवटची अमावस्या आहे खूप खास; या गोष्टी दान केल्यास मिळेल पुण्य...

23 डिसेंबर 2022 ला हा पौष महिन्यातील अमावस्या आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षाचा हा शेवटचा दिवस असेल आणि दुसऱ्या दिवसापासून शुक्ल पक्ष सुरू होईल. पौष महिन्यातील अमावास्येला स्नान करून तीर्थ दान करण्याची परंपरा आहे. वर्षातील इतर अमावस्यांपेक्षा ही अमावस्या अधिक महत्त्वाची मानली जाते. पितरांनाही या सणात श्राद्ध केल्याने समाधान मिळते. पौष महिन्याची अमावस्या अतिशय शुभ संयोगाने येत आहे. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा विशेष योगायोग आहे. आजच्या लेखात वर्षातील शेवटच्या अमावस्येचे शुभ योग आणि उपाय जाणून घेऊ या.

आता बघू या पौष अमावस्या हिवाळ्यातच का साजरी होते?

आयुर्वेदानुसार, हिवाळा ऋतूनुसार घेतला जाणारा आहार शरीरास पोषक असतो. या दिवसांत फळ आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूत प्रचंड भूक लागते तसेच पचनसंस्था चांगली राहते. शरीर कोरडं आणि रुक्ष पडू नये यासाठी अनेकदा स्निग्ध पदार्थ्यांची आवश्यकता असते. यामुळे वेळ अमावस्याला बाजरीची भाकरी आणि गरम पदार्थ्यांची घरोघरी एक मेजवानी असते.

यंदा पौष अमावस्येला शुभ योगायोग कोणते आहेत?

ज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षी पौष अमावस्येला असा शुभ योगायोग घडत आहे. यामुळे पितरांसह माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूप खास असेल. पौष अमावस्या 23 डिसेंबरला आहे. तर हा दिवस शुक्रवार आहे, तसेच हा दिवस देवी लक्ष्मीलाही समर्पित आहे. या दिवशी केलेले उपाय पितरांसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून दुहेरी लाभ देतात. अमावस्या तिथी 22 डिसेंबरच्या संध्याकाळी 7:13 पासून सुरू होईल आणि 23 डिसेंबर रोजी दुपारी 3:46 पर्यंत असेल. 

हेही वाचा: Winter Recipe: हिवाळ्यात खायला पौष्टिक असणारी कुळीथ पिठी कशी तयार करायची?

पौष अमावस्येच्या दिवशी काय करावे?

● तांब्याच्या किंवा पितळ्याच्या कलशात गंगाजल आणि गूळ घालून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.

● पितरांचे आवडते अन्न बनवा, त्यानंतर प्रथम गाय, कुत्रे आणि कावळे यांना खाऊ घाला.

● पितरांचे नाव घेऊन संध्याकाळी तुपाचा दिवा लावा.

● या दिवशी गरजूंना दान जरूर करा.

● या दिवशी विष्णु सहस्त्रनाम चा 108 वेळा जप करा.

● जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल किंवा धनात वाढ होत नसेल तर पौष अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराची विधिवत पूजा करावी.

हेही वाचा: Christmas Special Recipe: ख्रिसमस स्पेशल पीनट बटर ग्रॅनोला बार कसा तयार करायचा?

पौष अमावस्येच्या दिवशी काय करू नये?

1) या दिवशी राग येणे टाळावे.

2) धूम्रपान आणि मद्यपान टाळा.

3) संध्याकाळी झोपणे टाळा.

4) मीठ, तेल आणि लोहाचे दान टाळावे.

5) पौष अमावस्येच्या दिवशी तुम्ही जितके कमी बोलाल तितके जास्त फायदेशीर ठरेल.

पौष अमावस्येच्या दिवशी काय दान करावे?

या दिवशी उबदार लोकरीचे कपडे, तीळ, तेल, वहाणा, आवळा, फळे, मैदा, साखर, तांदूळ, मध, तूप, आरसा इत्यादी दान करावे.