Venus Transit in Libra 2026
esakal
नोव्हेंबर महिन्याचा शेवट काही राशींसाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी शुक्र ग्रह पुन्हा एकदा तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, तूळ ही शुक्राची स्वतःची रास असल्याने या राशीत त्यांची स्थिती मजबूत मानली जाते. याआधी शुक्र कन्या राशीत गेले होते. आता पुन्हा तूळ राशीत आल्याने त्यांच्या गोचराचा परिणाम काही राशींवर दिसू शकतो.