
Old Shiva Temples in Pune : आज महाशिवरात्री, महाशिवरात्रीचा उत्सव संपूर्ण देशात खूप उत्साहात साजरा केला जातो, आजच्या दिवशी महादेवाला मागितलेली कोणतीही इच्छा कधीच अपूर्ण राहत नाही. यादिवशी महा मृत्युंजय जपाचे पारायण करणे खूप चांगले असते. लोक यादिवशी उपवासही ठेवतात.
महाशिवरात्रीला सकाळी मंदिरात दर्शनासाठी जाणे खूप चांगले असते. याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अनेक लोकं ज्योतिर्लिंगाला सुद्धा जातात, पण प्रत्येकाला हे शक्य नाही, पण तुम्ही पुण्याच्या या मंदिरांना दर्शनासाठी जाऊ शकतात.
१. ओंकारेश्वर मंदिर, शनिवार पेठ, पुणे (Omkareshwar Mandir)
ओंकारेश्वर मंदिर हे पुण्यातील शंकराचे एक पेशवेकालीन मंदिर आहे. नक्षीकामाचे नऊ कळस, महर्षी व्यासांचे शिल्प, हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरूंचे शिल्प, अंतर्गत प्रदक्षिणामार्ग अशी आगळी वेगळी वैशिष्ट्ये असलेल्या पेशवेकालीन ओेंकारेश्वर मंदिराची २ जुलै २०२२ रोजी स्थापनेची २८४ वर्षे पूर्ण झाली आहे.
२. पर्वती टेकडी, पुणे (Devdeveshwar Temple)
मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी तावरे पाटील यांच्या कडून जमीन घेऊन देवदेवेश्वर मंदिर बांधवून घेतले. आपल्या आई काशीबाईंच्या सांगण्यावरून २३ एप्रिल, इ.स. १७४९ रोजी हे मंदिर उभारले गेले. मंदिराची रचना आधुनिक हिंदू शैलीत केलेली आहे. त्याचा कळस उंच व निमुळता असून त्यावर सोन्याचा मुलामा दिला आहे. मंदिर परिसरातील चौकोनी बैठकीच्या चार कोपऱ्यात चार लहान मंदिरे आहेत ती सूर्यदेव (आग्नेय), गणेश (नैर्ऋत्य), अंबाबाई (वायव्य) आणि विष्णू (ईशान्य) यांना समर्पित आहेत.
३. मृत्युंजयेश्वर मंदिर, कोथरूड, पुणे (Mrutyumjayeshwar Temple)
महाराजा छत्रसाल यांनी बाजीरावांना त्यांची मुलगी मस्तानीचा हात दिला. बाजीराव आधीच विवाहित होते आणि एकपत्नीत्वाच्या परंपरेचे पालन करत होते. तरीही त्यांनी मस्तानीशी लग्न करून तिला पुण्यात आणले. मस्तानीच्या मुस्लीम वारशामुळे हा विवाह त्याच्या कुटुंबीयांनी मान्य केला नाही. याची पर्वा न करता मस्तानी काही काळ बाजीरावांसोबत शनिवार वाड्यात राहिली. तथापि, मस्तानीबद्दल त्यांच्या कुटुंबातील वाढत्या शत्रुत्वामुळे बाजीरावांनी १७३४ मध्ये कोथरूडमध्ये तिच्यासाठी स्वतंत्र निवासस्थान बांधले. श्री मृत्युंजयेश्वर मंदिर मस्तानीच्या कोथरूड येथील निवासस्थानाशेजारी होते .
४. पाताळेश्वर मंदिर, जे. एम. रोड, पुणे (Pataleshwar Temple)
पाताळेश्वरचे मंदिर एकाच मोठ्या खडकात खोदकाम करून निर्माण केले आहे. ह्या मंदिरात राम, सीता, लक्ष्मण, लक्ष्मी आणि गणेश ह्या दैवतांच्याही मूर्ती आहेत. त्या अर्थातच नंतर कुणीतरी ठेवल्या आहेत. हे शिवालय राष्ट्रकूट राजवटीचा सहावा राजा पहिला अमोघवर्ष (इ.स ८१४ - ८७८) याने त्याच्या काळात इ.स.च्या ८ व्या शतकाच्या सुमारास लेण्याच्या स्वरूपात खोदून घडवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.