

What is Wari Prasthan?
esakal
Inside Wari's Philosophy: "येणे मार्गे जया ठाया जाईजे। तो गावो आपणचि होईजे..."
आषाढी वारीचे वेध लागले की,अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते संतांच्या पालख्यांच्या 'प्रस्थानाचे'! आळंदी, देहू, त्र्यंबकेश्वर, पैठण अशा संतांच्या पावन भूमीतून लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात. पण पालखीचं प्रस्थान होतं म्हणजे नेमकं काय? आणि वारकरी संप्रदायातील 'प्रस्थानत्रयी' म्हणजे काय? याचा रंजक आणि आध्यात्मिक प्रवास समजून घेऊया.
काल ७ जुलैला श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. देहूच्या मुख्य मंदिरातून पालखी निघाल्यानंतर जवळच असणाऱ्या इनामदार वाड्यात एक दिवस पालखी थांबते व पुढच्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहराच्या दिशेने पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होते. आज ८ जुलैला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान आळंदी येथील मुख्य समाधी संजीवन मंदिरातून होईल. वारकरी संप्रदायामध्ये पालखीच्या या प्रस्थानाला खूप महत्व आहे. संप्रदायातील प्रस्थानत्रयी या संकल्पनेशी या प्रस्थानाचा वैचारिक संबंध कसा आहे हे जाणून घेऊयात.