

Weekly Horoscope
esakal
साप्ताहिक राशिभविष्य: १४ ते २० सप्टेंबरचा आठवडा ठरणार खास! ‘या’ राशींना पैसा, करिअरमध्ये संधी आणि प्रेमात सुख १४ ते २० सप्टेंबर २०२६ हा आठवडा काही राशींसाठी खूप चांगला ठरण्याची शक्यता आहे. या काळात बुधादित्य, नीचभंग आणि बुध-अरुण नवपंचम राजयोगाचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे मेष, वृषभ, सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत चांगल्या संधी मिळू शकतात.
नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी किंवा प्रोजेक्ट मिळू शकतो, तर काही जणांना नोकरी बदलण्याची संधीही मिळू शकते. आर्थिक बाबतीतही हा आठवडा चांगला जाण्याची शक्यता आहे. चला तर मग, या सहा राशींसाठी हा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया.