Weekly Horoscope: या राशींसाठी हा आठवडा लकी! बदलेल तुमचं नशीब; तुमची रास कोणती?

या तीन राशी कोणत्या ते आपण आज जाणून घेऊया. तसेच तुमच्या राशीत काय योग आहे तेही आपण जाणून घेऊया
Weekly Horoscope
Weekly Horoscopeesakal

Horoscope: क्रिसमसच्या नंतरतचा आठवडा काही राशींसाठी लकी ठरणार असून त्यांच्या जीवनात आनंदी आनंद पसरणार आहे. तीन राशींच्या ग्रह अगदी नीट असणार असून त्यांना या दिवसांत लाभच लाभ होईल. या तीन राशी कोणत्या ते आपण आज जाणून घेऊया. तसेच तुमच्या राशीत काय योग आहे तेही आपण जाणून घेऊया.

ज्योतिष्यांच्या मते, वर्षाचा शेवटचा आठवडा सिंह, मकर आणि मीन राशींसाठी फार शुभ ठरणार आहे. तर काहींचा या आठवड्यात भरपूर खर्च होणार आहे. चला तर वर्षाचा शेवटचा आठवडा कोणत्या राशींसाठी कसा असेल ते आपण जाणून घेऊया. (Horoscope)

मेष - मेष राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा शुभ असणार आहे. आठवड्याच्या सुरूवातीला पैशांची बचत होईल. मात्र तुम्ही या आठवड्यात गुंतवणुक करणे टाळायला हवे.

वृषभ - या आठवड्यात धनाचा वर्षाव होईल. मात्र तुम्ही या आठवड्यात मोठी गुंतवणुक करण्यापासून दूर राहा. कारण तुमच्यामागे याबाबतीत काही कटकारस्थान होऊ शकतं. तुमच्या आयुष्यातील एखादं सीक्रेट उलगडू शकतं. (Weekly Horoscope)

मिथुन - या आठवड्यात खर्चात वाढ होईल. मात्र तुम्ही खर्चात बचत करण्यापासून वाचू शकता. तेव्हा तुम्ही योग्य बजेट प्लान करायला हवा.

सिंह - या आठवड्याची सुरूवात तुमच्यासाठी चांगली असेल. आर्थिक खर्च वाढेल मात्र तुमची आवकही सुरू राहील. या आठवड्यात तुम्हाला एखादी गोड बातमीही मिळू शकते. घरच्याचं आरोग्यही व्यवस्थित राहील.

कन्या - आर्थिक गोष्टींमध्ये फार विचार करून खर्च करा. तुम्हाला धनप्राप्ती तर होईल मात्र दुसऱ्यांचे खर्च पूर्ण करता करता तुमचे पैसे जातील. भविष्यात समस्यांचा सामना करावा लागेल.

Weekly Horoscope
Year End Horoscope: वर्षाच्या शेवटच्या वीस दिवसांत या पाच राशींचं बदलणार नशीब; तुमची रास कोणती?

तुळ - या आठवड्यात तुम्हाला काही योजनांचा लाभ मिळू शकतो. मात्र घाईत कुठलाही निर्णय घेऊ नका. शुभचिंतकाच्या सल्ल्याने निर्णय घ्या. घरातील वातावरण आनंदी राहील.

वृश्चिक - या आठवड्यात घरातील खर्चात बचत होईल. स्वनिर्णय या आठवड्यात तुम्हाला आर्थिक संकटात पाडू शकतात. घराच्या दूर राहात असाल तर या आठवड्यात एकटेपणा जाणवेल. आर्थिक तंगी येईल.

धनु - नोकरीपेक्षा तुम्हाला या आठवड्यात पैशांची जास्त गरज भासेल. तुमच्या अनावश्यक खर्चामुळे या आठवड्यात तुमच्याजवळ पैसे उरणार नाहीत. वेगवेगळ्या कारणाने तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो.

मकर - वर्षाचा शेवटचा आठवडा तुमच्या कुटुंबासाठी आनंद घेऊन येईल. आईवडिलांकडून प्रेम मिळेल. तुमच्या थांबलेल्या कार्यासाठी तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल.

Weekly Horoscope
New Year 2023 : ख्रिसमस, थर्टी फर्स्टला दारुची दुकानं पहाटे पाचपर्यंत राहणार सुरू

कुंभ - या राशीसाठी हा आठवडा चांगला राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीपासून दूर राहा. बाळाची गोड बातमीही मिळू शकते.

मीन - तुमचा कोर्टात खटला सुरू असेल तर या आठवड्यात त्याचा निर्णय येण्याची शक्यता आहे. न थांबता प्रयत्न करत राहा. तुमच्यासाठीचे नवे प्रस्ताव आकर्षक ठरतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com