esakal | राशी भविष्य | Weekly Horoscope | eSakal
sakal

बोलून बातमी शोधा

भविष्य
मेष
मेष

नव्या ओळखी लाभदायक

सप्ताहात बलवान चंद्र शुभ ग्रहांच्या योगांतून मस्त फळे देईल. सकारात्मक राहा. भूतकाळ आठवू नकाच. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना नव्या ओळखींतून लाभ. ता. ३० आणि १ हे दिवस एकूणच मोठे प्रवाही. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी बलवत्तर विवाहयोग. बॅंकेची कामे होतील. कृत्तिकाचा सन्मान.

वृषभ
वृषभ

तरुणांच्या समस्या संपतील

सप्ताह व्यावसायिक तेजी ठेवेल. ता. २७ चा सोमवार तरुणांचे भाग्योदय करेल. ता. २९ ची कालाष्टमी गाठीभेटींतून उत्तम फलदायी होणारी. मृग नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक वसुली होईल. रोहिणी नक्षत्रास शुक्रवार घरातील तरुणांचे प्रश्‍न मिटवणारा. कृत्तिका नक्षत्रास उत्तम नोकरी मिळेल.

मिथुन
मिथुन

व्यवसायात यश मिळेल

सप्ताहात बुध-शुक्राचे फिल्ड राहील. व्यावसायिक मार्केटिंग यशस्वी होईल. ता. २८ ते ३० हे दिवस चढत्या क्रमाने शुभ. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३० चा गुरूपुष्यामृत पुत्रोत्कर्षातून धन्यता देणारा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखीतून विवाहप्रस्ताव येतील. पितृपंधरवडा आड आणू नका. ठरवून टाका.

कर्क
कर्क

वास्तुयोगाचा कालखंड

चतुर्थातील शुक्रभ्रमण गृहसौख्याच्या बाबतीत मंद-मंद झुळकांतून आनंद देईल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्ती जीवनातील उत्तम ट्रॅक पकडतील. ता. ३० चा गुरुवार एकूणच शुभसंबंधित. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट वास्तुयोगाचा. पुष्य नक्षत्राचा सन्मान. सरकारी कामे.

सिंह
सिंह

महत्वाच्या गाठीभेटी कराच

सप्ताहातील ग्रहांचे फिल्ड बुद्धिजिवी मंडळींना फारच सुंदर. बुध-शुक्राचे ग्रासकोर्ट राहील. महत्त्वाच्या गाठीभेटी कराच. पितृपंधरवड्याचे सावट नको. मघा आणि उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींस ता. २९ व ३० हे दिवस अतिशय प्रवाही आणि यश देणारे. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार मोठा यशस्वी व गोड.

कन्या
कन्या

जनसंपर्कातून भाग्यबीजे पेरली जातील

व्यावसायिकांना सप्ताह सतत हसत खेळत ठेवेल. बुध-शुक्राचे ग्रासकोर्ट तेजीची टवटवी ठेवेलच. सप्ताह मार्केटिंगला अतिशय उत्तम. मास्क लावून बाहेर पडाच. चित्रा नक्षत्रास ता. २७ ते ३० हे दिवस जनसंपर्कातून भाग्यबीजे पेरतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी व कायदेशीर कामांतून यश.

तूळ
तूळ

सरकारी कामे होतील

सप्ताहात ग्रहांचे फिल्ड तरुणांना त्यांच्या उपक्रमांतून यश देणारे. बेरोजगारांना दिलासा मिळेल. विशिष्ट शैक्षणिक चिंता जाईल. बाकी व्यावसायिकांना ता. २८ ते ३० हे दिवस प्रसन्नच ठेवतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना अपवादात्मक मोठे लाभ. सरकारी कामे मिळतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखींतून विवाहप्रस्ताव.

वृश्चिक
वृश्चिक

थोरामोठ्यांच्या सहकार्यातून मोठा दिलासा

सप्ताहात आहे ती परिस्थिती सांभाळा. मोहात पडू नका. आहे ती नोकरी सोडू नका. बाकी अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठ्या प्राप्तीचा. बॅंकेची कामे होतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना थोरामोठ्यांच्या सहकार्यातून मोठा दिलासा. नवपरिणितांना दैवी प्रचिती. उपासनेला दृढ चालवावे.

धनु
धनु

वाडवडिलांचे आशीर्वाद फलद्रूप होतील

सप्ताह राशीतील गुरू-शनीच्या अधिष्ठानातून पूर्वसुकृत फळास आणणाराच. वाडवडिलांचे आशीर्वाद फलद्रूप होतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्ती याचा अनुभव घेतील. ता. २८ ते ३० हे दिवस मोठे नावीन्यपूर्ण. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची प्रतीक्षा संपेल. घरातील तरुणांचे प्रश्‍न मिटतील. उत्तराषाढा नक्षत्रास नोकरीत बढती.

मकर
मकर

चांगली नोकरी मिळेल

सप्ताहात एक मोठा आत्मविश्‍वास येईल. साडेसातीला कधीही नावं ठेवू नका. सप्ताह पूर्वसुकृतातून फळं देणारा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती याचा पूर्ण अनुभव घेतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३० चा गुरुवार गुरूकृपेचा! उत्तराषाढा नक्षत्रास छान नोकरी मिळेल.

कुंभ
कुंभ

बुद्धिचातुर्यातून मोठे लाभ होतील

राशीचा नेपच्यून कनेक्‍टिव्हिटीचा प्रॉब्लेम ठेवणार नाही आणि बुधाची विशिष्ट स्थिती बुद्धिचातुर्यातून मोठे लाभ देईल. ता. २९ व ३० या दिवसांत पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती फ्लॅश न्यूजमध्ये येतील. अर्थातच सुवार्तांतून धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नक्षत्रलोकांतून इम्युनिटी डोस! शततारका नक्षत्राच्या लोकांची गुप्त आरोग्यचिंता जाईल.

मीन
मीन

तरुणांचे प्रश्‍न मार्गी लागतील

सप्ताहात आहे ते जपा ! तेच मिळवण्यासारखे आहे ! बाकी सप्ताहात वैवाहिक जीवनातील प्रश्‍न सुटतील. सप्ताह घरातील तरुणांचे प्रश्‍नसुद्धा मार्गी लावेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २९ ची अष्टमी कर्जमुक्त करणारी. रेवती नक्षत्राच्या व्यक्तीसाठी ता. ३० चा गुरूपुष्यामृत योग भाग्यबीजे पेरणारा!

go to top