रवी-शनी षडाष्टक योग होत असल्यामुळे विरोधकांकडून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले जाईल. सत्ताधारी पक्ष, मंत्री, प्रमुख नेत्यांवर मोठे आरोप होतील. काही प्रमुख नेते कायदेशीर कटकटींमध्ये अडकतील. पक्षचिन्ह, पक्षाच्या नावावर होणाऱ्या न्यायालयातील प्रकरणांच्या निकालाबाबत संभ्रम कायम राहील, असं भाकित ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर यांनी व्यक्त केलं आहे. तसेच गुरू-शुक्र योगामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी पक्षांतील इनकमिंग मोठ्या प्रमाणावर होईल, असंही ते म्हणाले.
अमेरिकेमध्ये ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शने होतील. अनेक देश ट्रम्प आयात शुल्काविरोधात एकत्र येऊन बंडाच्या पावित्र्यात उभे राहतील. एकप्रकारचे व्यापार युद्ध सुरू होण्याची शक्यता राहील. अन्य देशांशी होणाऱ्या करारांविषयी मोठा संभ्रम निर्माण होईल, असंही त्यांनी सांगितलं.