
buying gold on Dussehra for prosperity
Sakal
दसऱ्याच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे.
यामागे कोणती धार्मिक किंवा पारंपारिक कारणे आहे. या
दिवशी सोनं खरेदी करणे हे माता लक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक मानले जाते.
Spiritual and financial significance of gold on Vijayadashami: विजयादशमी सणाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. तसेच या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात, सोनं खरेदी करणे हे माता लक्ष्मी मातेच्या कृपेचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी केल्यास अनेक फायदे होतात. ही परंपरा केवळ आर्थिक गुंतवणूक नाही, तर आध्यात्मिक आणि वास्तूशास्त्रीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे. दसऱ्याला सोनं खरेदी का केले जाते हे जाणून घेऊया.