नक्षत्र म्हणजे काय? Nakshtra Information In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nakshtra

Spiritual Facts : नक्षत्र म्हणजे काय?

सौ. कानन माधव काकरे

( ज्योतिष तज्ञ आणि टॅरोट कार्ड रीडर)

Nakshtra Information In Marathi : "न क्षरती तत्" आकाशा त जी आपल्या स्थानापासून ढळत नाहीत ते म्हणजे नक्षत्र होय. अशी सत्तावीस नक्षत्र आहे. सूर्य ज्या वर्तुळाकार मार्गाने पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना आजूबाजूला काही आकर्षक ठळक असे तारे किंवा तारकापुंज दिसतात त्यांना नक्षत्र असे म्हणतात.

हेही वाचा: Sade Sati : साडेसाती म्हणजे काय?

थोडक्यात सांगायचे म्हणजे, ज्या मार्गाने ग्रह सूर्याभोवती फिरतात त्या मार्गाला क्रांतीवृत्त असे म्हणतात. हे क्रांतीवृत्त दीर्घ वर्तुळाकार आहे. क्रांतीवृत्ताचे 360 ° सारखे सत्तावीस भाग केले आहेत. या 27 भागांना 13 अंश 27 कलांचा एक एक भाग केलेले आहेत. या विभागात काही तारकापुंज आहेत त्यालाच नक्षत्र असे म्हणतात.

हेही वाचा: Astro Tips : आजार बरा होण्याचं नावचं घेत नाहीये? स्मशानभूमीतले हे उपाय करतील मदत

ग्रह म्हणजे काय?

आकाशात सूर्याभोवती जे थंड गोलाकार गोळे फिरतात त्यांना ग्रह असे म्हणतात. हे ग्रह सूर्याभोवती त्याच्या उर्जेने त्याच्या तेजाने फिरत असतात जेव्हा ते सूर्यासमोर समोर येतात तेव्हा त्यांच्यावर प्रकाश पडतो. हे सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात म्हणजेच परिवलन करत असतात. प्रत्येक ग्रहाचा सूर्याभोवती फिरण्याचा लंब वर्तुळाकार मार्ग असतो. त्याला कक्षा असे म्हणतात.

हेही वाचा : Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

हेही वाचा: Kaala Dhaga : सावधान! 'या' राशीच्या लोकांनी चुकूनही बांधू नये काळा धागा; फायद्याऐवजी होईल नुकसान

ग्रह आणि नक्षत्र यातील फरक?

  • नक्षत्र आकाशात स्थिर असतात. मात्र ग्रह आकाशात स्थिर नसतात.

  • नक्षत्रांना गती म्हणजेच वेग नसतो. मात्र ग्रहांना गती म्हणजेच वेग असतो.

  • दोन नक्षत्रामध्ये अंतर कायम असते. मात्र दोन ग्रहांमधील अंतर कायम नसते.

  • नक्षत्र स्वयंप्रकाशित असतात, परंतु ग्रह आहे पर प्रकाशित असतात.

  • नक्षत्र लुकलुकतात परंतु, ग्रह लुकलुकत नाहीत.

  • नक्षत्रांचा प्रकाश कमी जास्त होतो. परंतु ग्रहांचा प्रकाश कमी जास्त होत नाही.

    वरील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.