Dhanteras 2022 : धनत्रयोदशीच्या पूजेचा मुहूर्त आणि शुभ योग कोणता आहे?

दिवाळीच्या सणातील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी.
Dhantrayodashi Puja
Dhantrayodashi PujaEsakal

दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्सवाचा सण… चार ते पाच दिवसांचा दिवाळसण गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच जण जल्लोषात साजरा करतात. दिवाळीच्या सणातील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी म्हणजेच वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी करतात. म्हणजेच वसूबारसनंतर धनत्रयोदशी येते. हा दिवस देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. धनत्रयोदशीला काही लोक धनतेरस असंही म्हणतात. 

यंदा हा सण आकाशातील बाराव्या नक्षत्र उत्तरा फाल्गुनीच्या छायेत साजरा होणार आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा शासक ग्रह सूर्य आहे, जो खूप शक्तिशाली ग्रह आहे आणि ग्रहांचा राजा देखील आहे, ज्यामुळे राजस स्थानामध्ये वाढ होईल आणि लोक जोरदार खरेदी करतील. यावेळी बाजारात खळबळ उडाली आहे. धनतेरस 22 ऑक्टोबरला संध्याकाळी 4 वाजून 33 मिनिटांनी सुरू होणार आहे.

Dhantrayodashi Puja
Diwali 2022: धनत्रयोदशीला यम दिवा कोणत्या दिशेला लावावा ?

उदया तिथीनुसार, धनत्रयोदशी 23 ऑक्टोबर 2022 रोजी आहे, परंतु धनत्रयोदशीचे मूल्य 22 ऑक्टोबरलाच असेल. उत्तरा फाल्गुनी हे राशीचे बारावे नक्षत्र आहे. हा पूर्वा फाल्गुनीचा उत्तरार्ध आहे आणि सिंह राशीच्या शेपटीवर स्थित दोन स्थिर ताऱ्यांमध्ये आहे. या नक्षत्राचा विस्तार कन्या राशीच्या पुढील क्षेत्रापर्यंत आहे. या दिवसात बुधाचे कन्या राशीत भ्रमण होत आहे, अशा स्थितीत कन्या आणि बुध दोघे मिळून अद्भुत परिस्थिती निर्माण करतील. त्यामुळे यंदाचा धनत्रयोदशीचा सण कीर्ती, आरोग्य, वैभव आणि निर्वाणाचा साक्षात्कार घेऊन येत आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात लक्ष्मी-कुबेराची उपासना केल्याने आर्थिक स्थितीसाठी संमिश्र फळ मिळेल, तर येणारे वर्ष अनेक बाबतीत मागील वर्षापेक्षा वेगळे वाटेल.

Dhantrayodashi Puja
Diwali Recipe: खारे शंकरपाळे कसे तयार करायचे?

आता बघू या धनत्रयोदशीच्या पूजेच्या वेळा आणि मुहूर्त कोणते आहेत?

धनत्रयोदशी 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.33 वाजता सुरू होईल. धनत्रयोदशी 23 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 5.40 पर्यंत असेल. धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोषकाळ किंवा वृषभ राशीत कुबेर आणि लक्ष्मीची पूजा करणे उत्तम. भगवान धन्वंतरी यांना हिंदू धर्मात देव वैद्याचा दर्जा आहे. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी अमृत चौघडिया, लाभ चौघडिया, वृषभ राशीत धन्वंतरीची पूजा करावी. 

अशा स्थितीत धनत्रयोदशीच्या पूजेसाठी 6 वाजून ते 7.30 आणि नंतर 9 वाजेपासून ते 9 वाजून 30 मिनिटांपर्यंतचा काळ उत्तम राहील.

Dhantrayodashi Puja
Diwali Recipe: घरच्या घरी कुरकुरीत खमंग मसाला शेव कसे तयार करायचे?

अकाली मृत्यू आणि त्रास दूर करण्यासाठी सूर्यास्ताच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर 4 दिवे दान करावेत. मोहरीचा तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. या दिवशी उत्तम आरोग्यासाठी भगवान धन्वंतरी आणि समृद्धीसाठी कुबेरासह लक्ष्मी गणेशाची पूजा करून भगवती लक्ष्मीला नैवेद्यात धने, गूळ आणि भाताचा लवा अवश्य अर्पण करावा. तसेच लक्ष्मी गणेश व कुबेर महाराज यांची आरती करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com