Diwali Recipe: खारे शंकरपाळे कसे तयार करायचे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Recipe

Diwali Recipe: खारे शंकरपाळे कसे तयार करायचे?

दिवाळी तोंडावर आली की चकली-शंकरपाळ्यांचा खमंग गंध घराघरात दरवळायला लागतो सध्या वातावरण पावसाळी असलं तरीही माणसांना फार फरक पडत नाही. आकाराने छोटे, चालता-फिरता चटकन तोंडात टाकता येणारा पदार्थ म्हणजे चटपटीत खारे शंकरपाळे,

आपण दिवाळी स्पेशल खास पारंपरिक पदार्थाच्या काही वेगवेगळ्या रेसिपी पाहणार आहोत त्यातील आठवी रेसिपी आहे, दिवाळी स्पेशल खारे शंकरपाळे कसे तयार करायचे ?

साहित्य: 

● एक वाटी मैदा

● पाव वाटी रवा

● कस्तुरी मेथी

● काळे तिळ

● मिठ 

● ओवा

● जिरं

● तेल

हेही वाचा: Diwali Recipe: बिना पाकाचे बेसन लाडु कसे तयार करायचे ?

कृती:

मोठ्या बाउलमध्ये एक वाटी मैदा घ्यावा. त्यात पाव वाटी रवा टाकावा त्यानंतर दीड चमचा ओवा घ्या आणि हातांनी कुस्करून मैदामध्ये मिक्स करावा. 

त्यानंतर कस्तुरी मेथी, काळे तिळ ,जिरे आणि पिठात चवीनुसार मीठ घालुन सर्व सामग्री नीट एकजीव करावी. 

यानंतर मिश्रणामध्ये थोडं-थोडं तेल मिक्स करा.

पीठ आणि तेल चांगल्या पद्धतीने एकजीव करा. पिठामध्ये गाठी तयार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.यानंतर मैद्यामध्ये कोमट पाणी ओता आणि पीठ मळून घ्यावे. 

मैद्याचे पीठ जास्त मऊ होणार नाही, याची काळजी घ्यावी. स्वच्छ कापडाच्या मदतीने 10 ते 15 मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवा.मळलेल्या पिठाचे तीन भाग करा. यानंतर लाटण्याला थोडेसे तेल लावून शंकरपाळीच्या पिठाची पोळी लाटून घ्या. फिरकीने शंकरपाळ्या पाडून घ्या.

पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर ओव्याच्या शंकरपाळ्या तळून घ्या. चॉकलेटी रंग येईपर्यंत शंकरपाळ्या फ्राय करत राहा. कुरकुरीत आणि गरमागरम शंकरपाळ्या तयार आहेत.चहा किंवा कॉफीसोबत शंकरपाळ्यांचा आस्वाद घ्यावा.