Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे काय? अन् वारकरी कोणाला म्हणतात?

Pandharpur Wari History Explained: वारी म्हणजे भक्तीचा प्रवास, तर वारकरी म्हणजे त्या प्रवासाचे निष्ठावान पंढरीचे भक्त!
Ashadhi Wari History
Ashadhi Wari HistorySakal
Updated on

वारी म्हणजे काय? (What is Pandharpur Wari)

वारी ही महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची अत्यंत पवित्र आणि श्रद्धेने परिपूर्ण यात्रा आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी हजारो भक्त पायी चालत ही वारी करतात. 'वारी' या शब्दाचा उगम 'वार' या शब्दातून झाला असून, त्याचा अर्थ एखादी गोष्ट नियमितपणे आणि सतत घडणे असा होतो. त्यामुळे वारी म्हणजे देवदर्शनासाठी नियमितपणे पंढरपूरला जाणे.

वारकरी संप्रदायाचे संतकवी – संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आदींच्या पालख्या या यात्रेचे प्रमुख केंद्रबिंदू असतात. या पालख्या त्यांच्या समाधी स्थळांवरून निघून पंढरपूरपर्यंत जातात. वारीचा मुख्य उद्देश केवळ दर्शन घेणे नसून, भक्तीभाव, साधना, संतांचे स्मरण आणि समतेचा संदेश पसरवणे असा आहे.

Ashadhi Wari History
Pandharpur Wari 2025 Schedule: वारी निघाली पंढरीला...कधी आहे रिंगण, कुठे आहे मुक्काम? दर्शनाची माहिती एकाच क्लिकवर

वारकरी कोणाला म्हणतात? (Who is Warkari)

वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस 'वारकरी' म्हणतात. ते वेगवेगळ्या वेशभूषेत, हातात टाळ, मृदुंग घेऊन अभंग गात गात, हरिनामाचा गजर करत पंढरपूरकडे वाटचाल करतात. अनेक जण विठ्ठलाच्या नामस्मरणात रंगून जातात. या यात्रेत धार्मिक विधींबरोबरच 'रिंगण' सारखे पारंपरिक खेळ, फुगडीसारखे लोकनृत्य आणि कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीचे वातावरण निर्माण केले जाते.

वारीचे प्रमुख आकर्षण (Wari Main Attractions)

वारीचे प्रमुख आकर्षण म्हणजे संतांच्या पवित्र पादुका, ज्या पालखीतून नेण्यात येतात. ही परंपरा संत तुकाराम महाराजांनी सुरू केली, तर हैबतराव अर्जुनराव अर्फळकर यांनी १९व्या शतकात पालखी सोहळा अधिक शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात रचला.

देहू आणि आळंदी इथून निघालेल्या वारीचे, पंढरपूर (Pandharpur) हे अंतिम ठिकाण आहे, जिथे विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आहे. 'विठोबा' किंवा 'विठ्ठल' हे विष्णूचे किंवा श्रीकृष्णाचे रूप मानले जाते. भक्तांच्या प्रतीक्षेत कमरेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला, विठोबा हा महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचे प्रतीक आहे.

Ashadhi Wari History
Pandharpur Wari Ringan: पंढरीच्या वारीतील 'रिंगण' म्हणजे काय? जाणून घ्या याचे प्रकार आणि महत्त्व

वारी ही केवळ देवदर्शनासाठीची यात्रा नाही, तर ती भक्ती, सेवा, शिस्त, समर्पण, समता आणि आनंद साजरा करण्याचा एक महाउत्सव आहे. म्हणूनच वारीला 'सोहळा' असे संबोधले जाते. हजारो लोकांचे एकत्र येणे, त्यांचे परस्पर सहकार्य, भावनिक एकता आणि हरिपाठ यामुळे वारीचा अनुभव भक्तांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा ठरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com