
थोडक्यात:
श्रावण महिन्यात येणारी कामिका एकादशी ही विष्णू भक्तांसाठी अत्यंत पूजनीय मानली जाते.
२०२५ मध्ये कामिका एकादशी २१ जुलै रोजी साजरी केली जाईल; उपवास, पूजा आणि तुळशीवंदन करण्याचा विशेष दिवस आहे.
या व्रतामुळे पापमुक्ती होते, मानसिक शांती मिळते आणि भगवान विष्णूची कृपा लाभते, असं मानलं जातं.
How to observe Kamika Ekadashi Vrat and Tulsi Puja: श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या महिन्यात अनेक व्रतवैकल्य, उपवास आणि विविध सण-समारंभ साजरे केले जातात. हा सर्वात पवित्र महिना मानला जातो.
तसेच हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या दिवशी ही एकादशी येते. या पवित्र एकादशांपैकी एक म्हणजे कामिका एकादशी, जी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात येते.
या दिवशी भगवान विष्णूच्या कृपेसाठी उपवास, पूजा आणि तुळशीची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की, यामुळे पापांपासून मुक्ती आणि आयुष्यात सौख्य आणि समाधान मिळते. यंदा ही एकादशी कधी आहे आणि यामागील धार्मिक महत्त्व काय ते जाणून घेऊया.
यंदा कामिका एकादशी २१ जुलै रोजी साजरी केली जाईल. ही तिथी २० जुलै २०२५ रोजी रविवारी दुपारी १२:१२ वाजता सुरू होईल आणि २१ जुलै २०२५ रोजी सोमवारी सकाळी ०९:३८ वाजता संपेल. त्यामुळे उपवास आणि पूजेसाठी योग्य तारिख २१ जुलै २०२५ असेल.
या दिवशी भक्तगण उपवास करतात आणि पूर्ण श्रद्धेने भगवान विष्णूची पूजा करतात. दिवा लावणे, धूप-दीप अर्पण करणे, नैवेद्य ठेवणे आणि विष्णू सहस्रनाम पठण करण्याची परंपरा आहे.
कामिका एकादशीचा उल्लेख धर्मग्रंथांमध्ये पापमुक्ती देणारी व आत्मशुद्धी साधणारी एकादशी म्हणून केला आहे. या व्रताचे पालन केल्याने दोष, नकारात्मक ऊर्जा आणि वैयक्तिक अडचणी कमी होतात, असे मानले जाते.
या दिवशी अभ्यंग स्नान, दानधर्म करणे आणि विशेषतः तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते. तुळशीचे १०८ वेळा नामस्मरण करणे आणि तुलसी वृंदावनाजवळ दिवा लावणे विशेष पुण्यकारी मानले जाते. जे श्रद्धाभावाने या व्रताचे पालन करतात, त्यांना भगवान विष्णूची कृपा लाभते आणि त्यांच्या आयुष्यात समाधान, आरोग्य आणि सौख्य नांदते, असे शास्त्रांमध्ये नमूद केले आहे.
कामिका एकादशी कधी आहे? (When is Kamika Ekadashi in 2025?)
२१ जुलै २०२५, सोमवार रोजी कामिका एकादशी साजरी केली जाईल.
कामिका एकादशीचा व्रत कशासाठी केला जातो? (What is the purpose of observing Kamika Ekadashi fast?)
पापमुक्ती, आत्मशुद्धी, आणि भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी हे व्रत केलं जातं.
या दिवशी कोणत्या पूजा केल्या जातात? (What rituals are performed on Kamika Ekadashi?)
भगवान विष्णूची पूजा, तुळशीवंदन, विष्णू सहस्रनाम पठण, आणि नैवेद्य अर्पण केलं जातं.
पारण कधी करावं? (When should the fast be broken – Parana timing?)
पारण २२ जुलै २०२५, मंगळवारी योग्य मुहूर्त पाहून केलं जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.