
when is Mahavir Jayanti in 2025: महावीर जयंती हा सण चैत्र शुक्ल त्रयोदशीला साजरा केला जातो. महावीर जयंती हा जैन धर्माचा सर्वात महत्वाचा सण आहे. हा भगवान महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. महावीर हे जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थंकर होते. महावीर जयंतीच्या दिवशी, भगवान महावीरांचे अनुयायी त्यांच्या शिकवणींचे स्मरण करतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि भक्तीभावाने विविध धार्मिक विधी करतात. यंदा महावीर जयंती 10 एप्रिल साजरी केली जाणार आहे. या दिवसाचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया.