

Rahu’s Influence on Mulank Numerology News
esakal
Mulank Marathi News : अनेकदा आपल्या आयुष्यात काही माणसं अशी येतात, जी सुरुवातीला खूप गोड बोलतात. त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच जादू असते आणि त्यांच्या याच स्वभावाला भुलून आपण त्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवू लागतो. पण काळ सरकतो, तसा त्यांचा खरा चेहरा समोर येऊ लागतो. जेव्हा त्यांना स्वतःची कामं करून घ्यायची असतात, तेव्हा ते तुमच्या अवतीभवती घुटमळत राहतील. पण गंमत अशी की ज्या क्षणी तुमच्यावर एखादं संकट कोसळतं, तेव्हा हीच माणसं सर्वात आधी काढता पाय घेतात. अंकशास्त्राच्या (Numerology) गूढ जगात अशा ठरावीक वृत्तीच्या लोकांमागे एक विशिष्ट अंकाची ऊर्जा काम करत असते, जी त्यांना नकळत स्वार्थी आणि संधीसाधू बनवते.