

Why Do We Say ‘Morya’ After Ganpati Bappa
sakal
Why ‘Morya’ Is Added to Ganpati Bappa’s Name: दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला आपल्या लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात घरोघरी आगमन होतं. पुढचे १०-१२ दिवस बाप्पा आपल्या घरी पाहुणे म्हणून विराजमान होतात. या काळात संपूर्ण वातावरण भक्ती, उत्साह आणि जल्लोषाने भारून जातं. गणपतीची आरती, भजन, आकर्षक मखर, घराची सजावट आणि बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक… या सगळ्यासोबतच कानावर सतत एकच जयघोष ऐकू येतो - “गणपती बाप्पा मोरया!”
पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, की गणपती बाप्पांचं नाव घेतल्यानंतर आपण “मोरया” असं का म्हणतो? या शब्दामागे नेमकी काय कथा आहे? चला, जाणून घेऊया “गणपती बाप्पा मोरया” या जयघोषामागची रंजक कहाणी!