

mangalsutra breaks repeatedly meaning in hindu culture
Sakal
Ppiritual reasons for mangalsutra breaking again and again: हिंदू धर्मात मंगळसुत्राला खुप महत्व आहे. खासकरुन विवाहित महिलांचे हे प्रतिक मानले जाते. लग्नाच्या वेळी वर वधुच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो. मंगळ या शब्दाचा अर्थ मंगल, शुभ आणि सौख्याचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे मंगळसूत्र हे जोडप्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. मंगळसूत्र हे काळ्या मण्यापासून बनवले जाते. कारण यामुळे नकारात्मक उर्जेपासून बचाव होतो. विवाहित महिलीने मंगळसूत्र धारण करणे हे तिच्या पतीच्या आयुष्याच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी स्थिरतेसाठी शुभ मानले जाते.